पत्नी परत मिळण्यासाठी तरूणाचा टाहो – एक महिण्यापूर्वी पुणे येथे केला आंतरजातीय विवाह

0
854
Google search engine
Google search engine

घरच्यांचा विरोध, पत्नीला परत आणुन घरी ठेवले डांबुन

चांदूर रेल्वे / शहेजाद खान –

कॉलेजमध्ये शिकतांना दोघात प्रेमाचा अंकुर फुटला . अशातच तरूण पुण्याला
कंपनीत खासगी  नोकरी लागला. दोघांनी एक साथ राहण्याचे पक्के केले आणि एक
महिण्यापूर्वी पुणे येथे आंतरजातीय विवाह केला. या विवाहाची माहिती घरच्यांना
माहित पडताच मुलींच्या नातेवाईकांनी बे-कायदेशीरपणे व बळजबरीने मुलीला
पुण्यावरून चांदूर रेल्वेला आणुन घरीच डांबुन ठेवले आहे. तेव्हापासून तरूणाचा पत्नी
परत मिळण्यासाठी सारखा टाहो सुरू आहे.
चांदूर रेल्वे येथे आयटीआय कॉलेजला शिकत असतांना अंकीत राजेश निकोसे
(वय २२) रा.मांजरखेड कसबा, ता.चांदूर रेल्वे व वर्ग मैत्रीनीमध्ये प्रेमांकुर फुटला
मुलगी विस वर्षाची व खेड्यावर राहणारी. पूढे अंकितला पुणे येथे खाजगी नौकरी
लागली. दोघेही वेगवेळया जातीचे व सज्ञान असल्याने जातीचे बंधने झुगारून थेट
पूणे गाठून १५/०१/१८ ला हिंदू वैदिक पध्दतीने आंतरजातीय विवाह केला. ही बाब
मुलीच्या घरच्यांना मान्य नव्हती. विवाह केल्यांची माहिती घरच्यांना मिळताच त्यांनी
थेट पूणे गाठले व मुलीला बळजबरीने व बे-कायदेशीर रित्या चांदूर रेल्वे ला आणुन
घरीच डांबुन ठेवले. तेव्हापासून अंकीतला त्यांची पत्नी सारखे फोन कॉल्स करून
तुझा व माझ्या जिवीताला धोका असल्याचे सांगीतले. ती प्रचंड मानसीक व शारीरिक
त्रासात असल्याचे तीने सांगीतले. अंकीतने फोन वरून पत्नीच्या घरच्यांशी संपर्क
साधण्याचा प्रयत्न केला, मात्र पत्नीसोबत बोलु दिल्या गेले नाही. अंकितने
पुण्यावरून थेट चांदूर रेल्वे गाठले. या संदर्भात चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला तक्रार
नोंदविण्यासाठी गेले असता ठाणेदाराने तक्रार घेण्यास नकार दिला व कोर्टात
जाण्याचा सल्ला दिला. शेवटी अमरावती जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे तक्रार
दिली. त्यांच्या आदेशाने मुलीचे गाव गाठले. गावचं पोलीस पाटील रूपेश कोरडे,
तंटामुक्त अध्यक्ष, अंकीत निकासे व त्यांचे मामा, आजी यांनी मुलीचं घर गाठलं.
मात्र मुलींच्या घरच्यांनी दारसुध्दा उघडले नाही व पत्नीला भेटू दिले नाही. माझी
पत्नी घरच्या मंडळीच्या प्रचंड दबावात असुन तीच्या जीवताला धोका आहे.
अशातच तिला काही झाल्यास माझे सासु सासरे, तीची मोठी बहिण, जावाई
जबाबदार राहतील असा आरोप अंकीत निकोसे यांनी केला आहे.