चांदूर रेल्वे बसस्थानकावर मराठी वाचन सप्ताहाला सुरूवात – २७ ते ५ मार्च पर्यंत चालणार सप्ताह

0
593
Google search engine
Google search engine

सवलतीच्या दरात मराठी पुस्तके विक्रीला

चांदूर रेल्वे/ शहेजाद खान –

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य
साधून मंगळवार (ता.२७) पासुन चांदूर रेल्वे बस स्थानक येथे मराठी वाचन
सप्ताहाला सुरूवात करण्यात आली. हा सप्ताह ५ मार्च पर्यंत चालणार असून या
निमित्त राज्यात बस स्थानकावर पुस्तक विक्रेत्याकडून सवलतीचा दराने मराठी
पुस्तके विक्रीला ठेवण्यात आली आहे.

चांदूर रेल्वे बस स्थानक येथे मराठी गौरव दिन सप्ताहाचे उद्घाटन पत्रकार प्रा.रवींद्र
मेंढे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी चांदूर रेल्वे आगार प्रमुख रमेश
उईके, वाहतुक निरिक्षक निलेश भगत, वाहतुक नियंत्रक गणेश खंडारे, वर्कशॉप इनचार्ज निलेश जगताप, पत्रकार राजेश सराफी, वाहक संतोष भलाई, मानिक
वाडेकर, मनिष इंगळे, प्रविण कहाळे, प्रविण घाटे, राजु सानप, केशव सुलताने, वैशाली
डोळस, हेंमत पुनसे, दिलीप गावंडे, शाम जगताप यांच्यासह चांदूर रेल्वे आगाराचे
सर्व चालक, वाहक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी चांदूर रेल्वे बस
स्थानकावर मराठी पुस्तक विक्रीचे स्टॉल लावण्यात आले असुन त्यामध्ये फक्त
मराठी पुस्तके सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध
राहणार आहे. ५ मार्च पर्यंत मराठी पुस्तक विक्री स्टॉलवर सुरू राहणार आहे. या
अभिनव उपक्रमाला प्रवाशांसह विद्याथ्र्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.