इंटरमिजीएट ड्रॉर्इंग ग्रेड परीक्षेत आदित्य चांदूरे तालुक्यातून अव्वल >< इंदिरा गांधी विद्यालयाचा विद्यार्थी

0
661
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे / शहेजाद खान –

महाराष्ट्र कला संचालनालयाच्या वतीने सन २०१७-१८ मध्ये घेण्यात आलेल्या
इंटरमिजीएट ड्रॉर्इंग ग्रेड परीक्षेत ‘ए ‘ग्रेड मिळवून आदित्य अनिल चांदूरे यांने चांदूर
रेल्वे तालुक्यातून अव्वल क्रमांक पटकविला आहे.
आदित्य हा चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथील इंदिरा गांधी
विद्यालयाचा विद्यार्थी आहे. आपल्या यशाचे श्रेय त्याने कला शिक्षक ईश्वर घाटोळ,
भूषण मांडळे व आईवडिलांना दिले आहे. या यशाबद्दल त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा
वर्षाव होत आहे.