आकोटातील सुवर्ण विहार येथे मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी – विविध कार्यक्रमांच्या आयोजनासह ,समाज संमेलन

0
713
Google search engine
Google search engine

आकोटः (संतोष विणके )

थोर संत श्री संत नरहरी महाराज यांच्या मुर्तीसह ईतर मुर्त्यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आकोट येथील सुवर्ण विहार मंदीरात दि.११ ते १५ मार्च दरम्यान आयोजीत करण्यात आला आहे.या सोहळ्याला विविध संत ,महंत,व मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये धार्मिक अध्यात्मिक कार्यक्रमासह सामाजीक कार्यक्रम पार पडणार आहेत अशी माहीती ४मार्च ला सुवर्ण विहार येथे आयोजीत पञकार परीषदेत देण्यात आली.आकोट शहरातील अकोला मार्गावरील सुवर्ण विहार परीसरात समाजबांधव व ईतर दानशुर व्यक्तींच्या भरीव योगदानातुन भव्य व आकर्षक असे मंदीर उभारण्यात आले आहे.यामंदीरात संत शिरोमणी नरहरी महाराजांसह ,आशापुरी भवानी माता ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,महाराजा अजमिढजींसह देवी देवताच्या मुर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे.त्यानिमित्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.सोहळ्या दरम्यान दररोज सकाळ संध्याकाळ धार्मिक कार्यक्रम राहणार आहे.यामध्ये 11मार्चला शहरातुन मुख्य मार्गावरुन मुर्त्यांची भव्य शोभायाञा काढण्यात येईल तर दि.१२ ला सायं .भजनांचा कार्यक्रम दि.१३ ला सायं देवी जागरण गोंधळ ,१४ मार्चला तानाजी आश्रम धामणगाव गढीचे ह.भ.प.केशवराज महाराज ,श्री क्षेञ वारी हनुमानचे महंत कृष्णानंद भारती महाराज,पुणे येथील आचार्य प्र. द.जोशी व ब्रम्हवृंदाच्या उपस्थीतीत मुर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.तर दि.१५ मार्च ला काल्याचे किर्तन ह.भ.प.गजानन महा.हीरुळकर करतील .यानंतर समाज संमेलन मेळावा व सत्कार समारंभ पार पडणार आहे.या सत्कार सोहळा समारंभ कार्यक्रमास विविध आमदार,नगराध्यक्ष तथा मान्यवरांची उपस्थिती राहील.तसेच महाराष्ट्र ,मध्य प्रदेश ,गुजरात आदी राज्यातील मान्यवरांना विशेष करुन निमंञीत करण्यात आले आहे.या भव्य दिव्य सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विविध समीत्या गठीत करण्यात आले असुन सुवर्ण विहार येथे जय्यत तयारी सुरु आहे.सुवर्ण विहार हे भक्तीपिठ ज्ञानपिठ शक्तीपिठ ठरेल असा दृढ विश्वास श्री संत नरहरी समाज सेवा मंडळ आकोटचे अध्यक्ष श्री रविंद्र मुंडगावकर ,यांनी व्यक्त केला.या पञकार परीषदेला कार्याध्यक्ष अशोक हीरुळकर ,उपाध्यक्ष किर्तीकुमार वर्मा ,सचिव पञकार मंगेश लोणकर ,कोषाध्यक्ष माधव अनासने ,संघटक गणेश ढोले,विशाल शेरेकर ,प्रमोद बहाळ,नितीन प्रांजळे,राजुभाऊ खडेकार,राजेश बुटे,गणेशराव भोरे ,निलेश गुहे,भाश्कर गुहे,रोषण माथने यांची उपस्थीती होती.