सर्पदंशाने महिलेचा मृत्यु जवळा (धोत्रा) येथील घटना

0
751
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
    सर्प दंशाच्या सगळीकडे घटना घडत असतांनाच जवळा (धोत्रा) येथे सर्पदंशाने एका महिलेचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
   प्राप्तमाहितीनुसार, चांदूर रेल्वे तालुक्यातील जवळा (धोत्रा) येथील किराणा व्यवसायी रविंद्र देशमुख यांची पत्नी कुमोद रविंद्र देशमुख (वय ४५) ह्या सोमवारी सर्व कामे आटोपुन रात्री ११ वाजता झोपण्याच्या तयारीत होत्या. अशातच त्यांना सर्पाने गालावर दंश केला. ह्या घटनेची माहिती होताच त्यांना तातडीने चांदूर रेल्वे येथील ग्रामिण रूग्णालयात आणण्यात आले. परंतु तेथेच त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या मागे पती, २ मुले, १ मुलगी सह बराच मोठा आप्तपरिवार आहे.
    विशेष म्हणजे, त्यांच्या घरी नागोबाचे ठान असल्याचे समजते. म्हणजेच त्यांची ह्यावर अपरंपार निष्ठा होती. तरीही असा प्रकार घडणे ही अत्यंत दुर्दैवी असल्याची परिसरात चर्चा असुन संपुर्ण जवळा गावात शोककळा पसरली होती.