निरपराध हिंदु कार्यकर्त्यांना नाहक गोवण्याचे षड्यंत्र थांबवा ! – विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना

127

बेंगळुरू – पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात निरपराध हिंदु कार्यकर्त्यांना नाहक गोवण्याचे षड्यंत्र थांबवावे, अशी मागणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली. गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी निरपराध हिंदूंना गोवण्याच्या षड्यंत्राच्या विरोधात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी कर्नाटकातील मंगळुरु, शिवमोग्गा, बेळगाव, बागलकोट आणि हुब्बळ्ळी या ठिकाणी आंदोलन केले. त्यामध्ये ही मागणी करण्यात आली. आंदोलनांनंतर हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने राज्यपालांना देण्यासाठीचे निवेदन  जिल्हाधिकार्‍यांना सुपुर्द करण्यात आले.

याविषयी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे,

१. या हत्येच्या अन्वेषणासाठी राज्य सरकारने विशेष अन्वेषण पथकाची (एस्आयटीची) स्थापना केली. तथापि गेल्या ७ मासांत एस्आयटी आरोपींना अटक करण्यात अपयशी ठरली

२. पुढे १८ फेब्रुवारीला पोलिसांनी मंड्या जिल्ह्यातील मद्दुरू येथील हिंदु युवा सेनेचे श्री. नवीन कुमार यांना अवैध शस्त्रास्त्रे बाळगल्याच्या नावाखाली अटक केली. आता त्यांनाच गौरी लंकेश हत्या प्रकरणात आरोपी म्हणून अडकवण्याचा प्रयत्न केला आहे.

३. या प्रकरणात श्री. नवीन कुमार यांच्या मित्राला पोलिसांनी अटक केली, तसेच प्राण गमावण्याचे भय दाखवून आरोप कबूल करण्यासाठी ते दबावतंत्राचा वापर करत आहेत. एवढेच नव्हे तर ‘श्री. नवीन कुमार यांनी गुन्हा कबूल न केल्यास त्यांचे ‘एन्काऊंटर’ (चकमकीत ठार मारणे) करण्यात येईल’, अशी धमकी त्यांना मिळाल्याचे उघड झाले आहे.

४. काही प्रसारमाध्यमांनी नवीन कुमार यांचा मित्र गिरीश, तसेच त्यांचा भाऊ यांची मुलाखत घेतली. त्यात पोलिसांनी त्यांनाही जीवाला धोका असल्याचे भय दाखवत ‘पोलिसांनी सांगितल्याप्रमाणेच न्यायाधिशांसमोर बोलायचे’, असा दबाव आणल्याचे स्पष्ट झाले आहे.

५. एकूण सर्व घटनाक्रम लक्षात घेता राज्य सरकार आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून राजकीय लाभ उठवण्यासाठी हिंदू संघटनांच्या निरपराध कार्यकर्त्यांना या प्रकरणात अडकवत असल्याचे स्पष्ट होत आहे.

६. यापूर्वीदेखील महाराष्ट्रातील पुरोगाम्यांच्या हत्या, तसेच मालेगाव बाँबस्फोट प्रकरण यांत निरपराध हिंदू नेत्यांना गोवण्याचे षड्यंत्र रचण्यात आले होते. त्याच धर्तीवर गौरी लंकेश प्रकरण हिंदू संघटनांच्या माथी मारून त्याद्वारे निवडणुकीत राजकीय लाभ करून घेण्याचा प्रयत्न चालू असल्याचे स्पष्ट होते. हे अत्यंत निंदनीय आहे.

७. राज्य सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले असून त्यांचे हे अपयश झाकण्यासाठीच ते या प्रकरणाचा दुरुपयोग करत आहेत.

आंदोलनातील सहभागी संघटना

या आंदोलनात श्रीराम सेना, हिंदु महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदु परिषद, भाजप, श्री योग वेदांत समिती, छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशन, नवभारत सेना, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था

जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।