नवीन कुमार यांच्या विरोधात ठोस पुरावाच नाही ! – विशेष अन्वेषण पथकाच्या अधिकार्‍याची माहिती

128

बेंगळुरू – गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक केलेले ‘हिंदु युवा सेने’चे श्री. नवीन कुमार यांच्या विरोधात ठोस पुरावा मिळाला नाही, अशी माहिती विशेष अन्वेषण पथकाच्या (एस्आयटीच्या) अधिकार्‍याने दिली. यामुळे गौरी लंकेश हत्या प्रकरणाशी संबंध नसतांनाही श्री. नवीन कुमार यांना गेल्या २० दिवसांपासून विनाकारण पोलीस कोठडीत ठेवल्याचे उघड झाले आहे. पोलिसांना महत्त्वाच्या गुन्ह्याचा छडा लावल्याचे श्रेय, तसेच सरकारला निवडणुकीत लाभ मिळवून देण्याचा उद्देश, यांमुळे हे घडले असल्याची पुष्टी या घटनांवरून होते.

अवैधपणे काडतुसे बाळगल्याच्या आरोपावरून १४ फेब्रुवारीला उप्पारपेटे पोलीस ठाण्यातील पोलिसांनी श्री. नवीन कुमार यांना अटक केली होती. त्यानंतर एस्आयटीने त्यांना गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात अटक केली. एस्आयटीने श्री. नवीन कुमार यांना न्यायालयात उपस्थित करून प्रथम ९ दिवसांची, तसेच कोणताही पुरावा नसतांना पुन्हा ८ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडून मागून घेतली होती.

जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।