*जेष्ठ स्वयंसेवक प्रल्हादराव बेंडे यांचे दुःखद निधन*

175

अचलपूर:-अचलपूर शहरातील संघाचे जेष्ठ एकनिष्ठ स्वयंसेवक व सामाजिक कार्यकर्ते प्रल्हादराव बाळकृष्ण बेंडे यांचे ७ मार्च २०१८ रोजी सकाळी ५ वाजता दिर्घ आजाराने वयाच्या ८६ व्या वर्षी दुख:द निधन झाले त्यांचे शिक्षण-४था वर्ग न.प.प्राथमिक मराठी शाळा अब्बासपूरा
येथे झाले.

लहानपणापासून स्वयंसेवक संघाचे संपर्कात
त्यामुळे भाषा व वाणीवर प्रभुत्व होते.लहानपणी शाखेत शिवाजीच्या गोष्टी सांगून मंत्रमुग्ध करून टाकायचे. १९४८ च्या दरम्यान संघावर बंदी असल्यामुळे ३ महिन्यासाठी तुरूंगवास भोगला. गृपमध्ये कुठल्याही विषयावर चर्चा करण्याची आवड विशेषकरून अध्यात्म व राजकारण.त्यांचे पश्चात पत्नी,प्रदिप व राजेंद्र मुले,सुना,मुली,नातवंड व मोठा आप्त परिवार आहे.त्यांच्यावर अंत्यसंस्कार स्थानीक चारवड हिंदु स्मशानभूमीत करण्यात आला अंत्यसंस्कारात भाजपा चे जिल्हा सरचिटणीस गजानन कोल्हे, माजी नगरसेवक नितीन डकरे,प्रफुल्ल कुकडे,अजय सिरसुध्दे,संघाचे सुधीर तारे,राजू महितकार,गजानन नंदनवार तसेच शहरातील असंख्य गणमान्य नागरिक सहभागी झाले.

जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।