स्थायी समितीच्या सभापतीपदी श्री विवेक कलोती यांची निवड

0
1278
Google search engine
Google search engine

अमरावती

अमरावती : अमरावती महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी आज भाजपचे विवेक कलोती यांची अविरोध निवड झाली आहे. आज स्थायी समिती सभापतीपदासाठी निवडणुक होणार होती. भाजपचे विवेक कलोती एकमेव उमेदवार रिंगणात असल्याने त्यांची सभापतीपदी अविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. कलोती यांच्या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालय परिसर आणि भाजप कार्यालयासमोर एकच जल्लोष साजरा केला. महापौर श्री संजय नरवने, स्थायी समितीचे मावळते सभापती श्री तुषार भारतीय, उपमहापौर सौ संध्या टिकले, भाजपचे शहर अध्यक्ष श्री जयंत डेहनकर, श्री किरण पातुरकर यांच्यासह सर्व भाजप नगरसेवक व पदाधिका:यांनी विवेक कलोती यांचे स्वागत केले. कलोती यांनी शहरातून विजयी रॅली काढली. ढोल-ताशांवर नाचत आणि गुलाल उधळत भाजप सदस्यांनी कलोती यांच्या विजयाचा आनंद साजरा केला.