तीन वर्षापासुन फरार  आरोपी अखेर खोलापूर पोलीसांचा जाळ्यात

0
563
Google search engine
Google search engine

गजानन खोपे/ वाठोडा शुक्लेश्वर :-

खोलापूर येथून गेल्या तीनवर्षापुर्वी जनावरे चोरी प्रकरणी आरोपी फरार होता शेख हमीद, शेख, मलग वय अंदाजे ३० वर्षे रा आकोट फाईल अकोला असे अटक केल्या आरोपीचे नाव आहे, शेख हमीद हा आरोपी आकोट फाईल अकोला येथे राहत्याघरी असलेल्याची गुप्त माहिती खोलापूर पोलीसांना मिळाली, त्याच माहिती च्या आधारे, पोलिसांनी सापळा रचुन आरोपीला पकडले.

दोन महिण्यापासून फरार असलेल्या आरोपीला देखील पोलिसांनी पकडले आहे सदर आरोपीने अल्पवयीन मुलीला दारापूर येथून पळून नेले होते, अंकुश गोपनारायन वय अदांजे २८ असे अटक केलेल्या आरोपी चे नाव आहे,
आरोपी बोरगांव मंजु येथे असल्याची गुप्तमाहिती खोलापूर पोलीसांना मिळाली त्या माहिती च्या आधारे अंकुश गोपनारायन ला बोरगांव मंजु येथून अटक करण्यात आली, ठाणेदार श्री सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखालील दुय्यम ठाणेदार श्री विनोद जांभळे , श्री शुभम शर्मा ,महेद्र पाथरे, सुरज फुकट, पफुल वऱ्हेकर ,यांना आरोपी पकडण्यात यश आले,