खारुवा (उत्तरप्रदेश) येथे समाजकंटकांनी श्री हनुमानाची मूर्ती फोडली

118

नेत्यांच्या पुतळ्यांनंतर आता देवतांच्या मूर्ती समाजकंटकांचे लक्ष्य

देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणारे हिंदुद्वेष्टेच होत ! सरकारने अशांना अटक करून जन्माची अद्दल घडेल अशी शिक्षा करावी, अशी हिंदूंची मागणी आहे !

 

बलिया – ऐतिहासिक नेत्यांच्या पुतळ्यांची तोडफोड चालू असतांनाच, आता समाजकंटकांनी देवतांच्या मूर्तींना लक्ष्य करणे चालू केले आहे. खारुवा (उत्तरप्रदेश) या गावातील एका शेतकर्‍याच्या शेतात असलेल्या श्री हनुमानाच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. हा प्रकार लक्षात येताच गावच्या सरपंचांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला. स्थानिक पोलीस प्रशासनाने आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे आश्‍वासन दिले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यासह अनेक ठिकाणी तणाव वाढला आहे. सर्वांना पूजनीय असलेल्या श्री हनुमानाच्या मूर्तीची विटंबना केल्यामुळे स्थानिक लोक संतप्त झाले असून दोषींना पकडून कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या घटनेमुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्‍वासन नागरिकांना दिले, तसेच सर्व पुतळ्यांना सुरक्षा देण्याचा आदेशही पोलिसांना दिला. ५ मार्चपासून त्रिपुरा, तमिळनाडू, बंगाल अशा विविध राज्यांत नेत्यांच्या पुतळ्यांच्या तोडफोडीच्या घटना घडत आहे.

जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।