अनुष्का शर्मा यांच्या ‘परी’ या चित्रपटावर पाकिस्तानात बंदी !

111

नवी देहली – अनुष्का शर्मा यांच्या ‘परी’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात ‘काळी जादू’चे समर्थन करण्यात आले, तसेच हा चित्रपट इस्लामविरोधी असल्याचा आरोप करत पाकिस्तानमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.

पाकिस्तानी चित्रपट परिनिरीक्षण मंडळातील सूत्राने सांगितल्यानुसार ‘परी’  चित्रपटात कुराणातील आयातांमध्ये हिंदु मंत्रही मिसळण्यात आले आहेत. याशिवाय काळी जादू करण्यासाठी कुराणातील आयातांचा वापर करत इस्लामचे नकारात्मक चित्र निर्माण करण्यात आले आहे. ‘कोणताही चित्रपट जर आमची संस्कृती आणि इस्लामिक इतिहास यांच्या विरोधात असेल, तर त्यावर बंदी घालणे योग्य आहे’, अशी भूमिका पाकिस्तान चित्रपट वितरक असोसिएशनचे अध्यक्ष चौधरी एजाज कामरा यांनी मांडली आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेल्या या भयपटाचे दिग्दर्शन प्रोसीत रॉय यांनी केले आहे.