अल्पवयीन मुलीची एकतर्फी प्रेम प्रकरणातून गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस 

115

केज तालुक्यातील ढाकेफळ येथे दहावीची परीक्षा देत असलेल्या अल्पवयीन मुलीची एकतर्फी प्रेम प्रकरणातून गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. तिची हत्या केल्यानंतर प्रियकरानेही स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री अकरा ते साडे अकराच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या सुनिता चटप व गणेश थोरात याच्यांत प्रेमसंबंध होते. दोन दिवसांपूर्वी सुनिताला लग्नासाठी स्थळ आले होते. त्यामुळे गणेश थोरात अस्वस्थ झाला होता. आपला विवाह सुनितासोबत लावून देण्याबाबत त्याने वडील व मुलीच्या वडिलांना शुक्रवारी रात्री फोनवरून मागणी केली होती. मात्र सखाराम थोरात यांचे वडील श्री सुर्यभान थोरात यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने पुर्ण विधी झाल्यावर लग्नाचे बघू असे गणेशच्या वडिलांनी त्यास सांगितले होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे पुढील तपास स्थानीक पोलीस करीत आहे

जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।