पतंगराव कदम यांच्या निधनाने काॅन्ग्रेसचा निष्ठावान नेता हरपला

128

शेगाव:- ” काॅन्ग्रेसचे ज्येष्ठ नेते मा.पतंगराव कदम यांच्या निधनाने काॅन्ग्रेसची मोठी हानी झाली आहे. स्वतः गरीबीतुन या पदापर्यंत पोहचल्यामुळे त्यांना गरिबीची जाणीव होती व गरीबांबद्दल कणव होती.त्यांच्या अनेक निर्णयातुन हे दिसुन येते. त्यांच्या अकाली निधनाने सर्व सामान्यांना नाळ जोडलेला नेता हरपला आहे.”अशा शब्दात जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या वतिने आयोजित कार्यक्रमात उपस्थित नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
बुलडाणा जिल्हा काॅन्ग्रेस कमिटीचे सरचिटणीस कैलास देशमुख यांनी रोहणकार लाँन शेगाव येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष प्रसेनजित पाटील हे होते. यावेळी प्रदेश प्रतिनिधी दयारामभाऊ वानखेडे, माऊली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वरदादा पाटील,बुलडाणा जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील,सौ.स्वातीताई वाकेकर,शैलेश पाटील, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष तेजेन्द्रसिंग चव्हाण,जिल्हा सचिव अँड.अमर पाचपोर,कार्य.सदस्य, प्रकाशराव देशमुख, तालुका अध्यक्ष अशोकराव हिंगणे, माजी नगराध्यक्ष अभयसिंग मोहता, महीला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सौ.सुनिता कलोरे,अल्पसंख्याक सेलचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. असलम खान,माजी शहराध्यक्ष बुढन जमदार,युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष गोपाल कलोरे,मा.नगरसेवक किरणबाप्पु देशमुख,बंडु रायणे, संग्रामपुर बाजार समितीचे उपसभापती राजु राठोड,संजय गांधी सुतगिरणीचे संचालक अजिंक्य टापरे,सरपंच सूरेश कराळे नितीन बाराहाते, संतोष टाकळकर, रामा बोरसे,अजय ताठे,कैलास काशेलानी,काशिनाथ डांगे, प्रविण सुरोशे,रहिम खान माजी सभापती विजय काटोले,लक्ष्मण गवई,पप्पू अग्रवाल, बाळासाहेब कोकाटे,आनंद फुलकर,राजुसेठ मुना,राजेश पारखडे,राजु पारखडे,अशोक भांड,निकूंज देशमुख सुभाष शेगोकार,प्रदिप खांदे,गणेश टापरे अनिल कलोरे यांच्या सह जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अमित जाधव यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.जयंतकुमार खेळकर यांनी केले

जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।