श्री प्रमोद मुतालिक यांच्यासह श्रीराम सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता -मंगळुरू (कर्नाटक) येथील पबवरील आक्रमणाचे प्रकरण

0
1161
Google search engine
Google search engine

बेंगळुरू – मंगळुरू येथील पबमध्ये झालेल्या आक्रमणाच्या प्रकरणात दक्षिण कन्नड तिसर्‍या जिल्हा सत्र न्यायालयाने सर्व ३० आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनाही आरोपी बनवण्यात आले होते. न्यायाधीश मंजूनाथ यांनी हा निकाल दिला. या निकालानंतर श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. २४ जानेवारी २००९ या दिवशी मंगळुरू येथील ‘अ‍ॅम्नेशिया – द लाऊंज’ या पबमध्ये एका गटाने तेथे आलेल्या काही मुलींना मारहाण केली होती. त्यानंतर या घटनेचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटले आणि श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. या प्रकरणात २७ जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. अधिवक्त्या आशा नायक आणि अधिवक्ता विनोद यांनी आरोपींच्या बाजूने न्यायालयात युक्तीवाद मांडला.

 

श्रीराम सेना आणि श्री. प्रमोद मुतालिक यांचे निर्दोषत्व सिद्ध झाल्याचे वृत्त दाबणारी हिंदुद्वेष्टी प्रसारमाध्यमे !

वर्ष २००९ मध्ये ही घटना घडल्यानंतर श्रीराम सेना आणि श्री. प्रमोद मुतालिक यांची प्रसारमाध्यमांकडून मोठ्या प्रमाणात मानहानी करण्यात आली. श्री. मुतालिक यांनाही अशा प्रकारे अवमानित करण्यात आले होते. आता मात्र या प्रकरणात न्यायालयाने या सर्वांची निर्दोष मुक्तता केल्यावर प्रसारमाध्यमांनी याविषयीचे वृत्त प्रसारित केले नाही. यावरून प्रसारमाध्यमांचा कमालीचा हिंदुद्वेष दिसून येतो.