संत नरहरी महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा शोभायाञेने दुमदुमले आकोट

133

आकोट(संतोष विणके )

अकोला मार्गावरील सुवर्ण विहार येथे संपन्न होत असलेल्या संत नरहरी महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्य काल( दि.११ला ) आकोट शहरातुन महाराजांच्या मुर्तीसह ईतर मुर्तींची भव्य दिव्य शोभायाञा काढण्यात आली.आकोट शहरातुन निघालेल्या या भव्य दिव्य विशाल शोभायाञेने शहर दुमदुमुन गेले होते.शोभायाञेची सुरवात सायं .५वा.नरसिंग मंदीर पटांगण येथुन करण्यात आली.

ही शोभायाञा याञा चौक,शनिवारा,केशवराज वेटाळ,जिनगर वाडी,पटेल चौक,सराफ बाजार,जयस्तंभ चौक,सोनु चौक,शिवाजी चौक,अकोला नाका या मार्गाने फीरुन सुवर्ण विहार येथे समाप्त झाली.मिरवणुक मार्गावर ठीकठीकाणी शोभायाञेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.मिरवणुकीचे स्वागत भव्य आतिषबाजी व पुष्प वर्षावाने उत्स्फुर्तपणे करण्यात येत होते.मिरवणुकीत अश्व,दिंडी पताका ,ध्वज सह पंचक्रोशीतील भजनी दिंड्यांचा भव्य दिव्य सहभाग होता.यावेळी ढोलाच्या भजनाच्या तालावर तरुण मंडळीसह आबालवृद्ध थीरकत होते.शोभायाञेतील भजनी दिंड्यांनी सादर केलेल्या अभंग ,गवळण ,भारुड,भजनाने सामान्यजन कौतुक करत होते.मिरवणुकीत संत नरहरी महाराज,अजमेढजी महाराज,राजमाता जिजाऊ ,राणी लक्ष्मीबाई ,राष्टसंत तुकडोजी महाराज,यांच्या वेशभुषा हुबेहुब साकारण्यात आल्या होत्या.

शोभायाञेतील भाविकांसाठी चहा पाणी शरबत मठ्ठ्यासह फळांचे वाटप अनेक ठीकाणी करण्यात आले.मिरवणुकीचे स्वागत पंचमुखी महादेव मंडळ,राजेश गोगटे,अशोकदादा मुंडगावकर ,माजी नगरसेवक दिपक वर्मा ,लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ जयस्तंभ ,सिंधि समाज मंडळ,शेगाव अग्रसेन पतसंस्था,संस्कृती संवर्धन समीती,यासह विविध सेवाभावी संस्था,मंडळे तथा नागरीकांनी भव्यदिव्यपणे केले.शोभायाञेत पणज,दिवठाणा,अकोली जहाँ.,उमरा,आसेगाव ,रुईखेड,कुटासा,चंडीकापुर ,बोर्डी,पिंपळोद,चौसाळा,गुल्लरघाट,पिंप्री.,वरुड बिहाडे ,हनवाडी,नंदीपेठसह विविध गावातुन मोठ्या संखेने भजनी दिंड्यांनी सहभाग होता.मिरवणुक मार्गावर शहर ठाणेदार गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.तर मिरवणुकीच्या यशस्वी संचलनासाठी संत नरहरी समाजसेवा मंडळाचे पदाधीकारी व कार्यकर्ते अवीरत झटत होते.हजारो भावीक भक्तांच्या गर्दीने दुमदुममलेल्या या शोभायाञेत पुरुष पांढऱ्या गणवेशात व महीला ह्या भगवी साडी ,फेटा परीधान करुन होत्या .शिस्तबद्ध पण भव्यदिव्य पणे निघालेल्या या मिरवणुकीने शहरवासीयांचे लक्ष वेधुन घेतले होते.

जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।