आकोट आयटीआय च्या रासेयो स्वयंसेवकांचे रक्तदान शिबीर संपन्न

66

अकोट/ संतोष विनके –

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.जिल्ह्यातील रुग्णांसाठी रक्ताची गरज ओळखून येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सोमवार (ता.१२)ला आयोजित रक्तदान शिबीरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन हे सर्वश्रेष्ठ दान केले.

या शिबीराचे उदघाटन कौशल्य विकास उद्योगाचे सहाय्यक संचालक डी.एल.ठाकरे यांनी केले.तर अध्यक्षस्थान प्राचार्य पी.के.खुळे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून अकोटच्या स्टेट बँकेचे शाखा प्रबंधक अजय कुट्टी,अकोल्यातील हेडगेवार रक्तपेढीचे रमेश देशपांडे,शहरातील चवाळे ट्रँक्टर्सचे संचालक प्रदिप चवाळे उपस्थित होते.तर गटनिदेशक सी.डी.शेळके,डी.एम.मेतकर आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

या शिबीरात रक्तदात्यांचे रक्तगटही तपासण्यात आले.रक्तदात्यांनी दिलेले रक्त सुरक्षितपणे रक्तपेढीला पाठविण्यात आले.शिबीरात प्रमुख अतिथींसह मान्यवरांनी रक्तदानाचे महत्व समजावून सांगितले.शिबीरात रासेयोचे कार्यक्रम अधिकारी विनोद नागोलकर,निदेशक अनंता गारोडे,देवेंद्र वसतकर,बी.एम..

या शिबीराचे उदघाटन कौशल्य विकास उद्योगाचे सहाय्यक संचालक डी.एल.ठाकरे यांनी केले.तर अध्यक्षस्थान प्राचार्य पी.के.खुळे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून अकोटच्या स्टेट बँकेचे शाखा प्रबंधक अजय कुट्टी,अकोल्यातील हेडगेवार रक्तपेढीचे रमेश देशपांडे,उद्योजक प्रदिप चवाळे उपस्थित होते.तर गटनिदेशक सी.डी.शेळके,डी.एम.मेतकर आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

रक्तदात्यांनी दिलेले रक्त सुरक्षितपणे रक्तपेढीला पाठविण्यात आले.शिबीरात प्रमुख अतिथींसह मान्यवरांनी रक्तदानाचे महत्व समजावून सांगितले.शिबीरात रासेयोचे कार्यक्रम अधिकारी विनोद नागोलकर,निदेशक अनंता गारोडे,देवेंद्र वसतकर,बी.एम.वानरे यांनीही रक्तदान केले.

शिबीरात प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी विनोद नागोलकर यांनी केले.सुत्रसंचालन श्री.गजभीये यांनी तर आभार प्रदर्शन रामदास घावट यांनी केले.शिबीरात १५ निदेशक,१०० स्वयंसेवक व ६०० प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला.