अमरावती जिल्ह्यातील ब्राम्हणवाडा-भगत येथे उद्या पासून भक्ती-शक्ती संगम सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव – महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे आयोजन

0
1636
Google search engine
Google search engine

अमरावती /विशेष प्रतिनिधी :-

जेष्ठ समाजसेवक श्री अन्ना हजारे यांची विशेष उपस्थिती 

 

 

भक्ती-शक्ती संगम सोहळा, कीर्तन महोत्सव आणि श्रीमद गाथा पारायण कार्यक्रम उद्या दिनांक १४  ते २१ मार्च  दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन उद्या बुधवारी  (दि. १४) सकाळी श्री विठ्ठल रुख्मिणी संस्थान आनंदधाम ब्राम्हणवाडा-भगत(निचित) शिराळा जिल्हा अमरावती येथे होणार आहे.

महोत्सवाच्या काळात सकाळी ७ ते ११ दरम्यान श्रीमद गाथा पारायण ,  गाथामूर्ती श्री संत हभप रामचंद्रबाबा बोदे महाराज यांचा द्वारे होईल.दुपारी ३ ते ५ वाजता संत तुकाराम महाराज चरित्र निरुपम तर सायंकाळी ५.३० ते ६.३० ला हरिपाठ व दररोज रात्री ७ ते ९ या वेळेत हरिकीर्तन होणार आहे. १९ मार्च ला वारकरी अधिवेशन संत मेळावा दुपारी ४ ते ५ या वेळेत होणार आहे. तसेच २० मार्च ला भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. दि. २१ मार्च ला  दुपारी  १२  ते २  दरम्यान काल्याचे कीर्तन आणि महाप्रसाद होणार आहे.

 

खालील महाराजांची राहणार कीर्तन सेवा