श्री मिलिंद एकबोटे यांना अटक – घरी जाऊन पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

0
1057
Google search engine
Google search engine

पुणे: भीमा कोरेगाव हिंसाचार भडकवल्याचा आरोप असलेल्या मिलिंद एकबोटे यांना अखेर अटक झाली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांचा घरी जाऊन अटक केली.

काही वेळापूर्वीच सुप्रीम कोर्टाने मिलिंद एकबोटे यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी एकबोटेंना अटक केली.

यापूर्वी हायकोर्टानेही एकबोटेंचा जामीनअर्ज फेटाळला होता. त्यामुळे एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता होती.