*गोवंशीय जनावरांची तस्करी; तिघांवर गुन्हा* मोठं रॅकेट सहभागी असल्याचा संशय

0
718

बीड : परळी वैजनाथ /
नितीन ढाकणे-

परळी :

सध्या मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेली गोवंशीय जनावरांची तस्करी ही पोलीस प्रशासनासाठी मोठी कसरतीची बाब झाली आहे.
अशाच आठ गोवंशीय जनावरे टेम्पोमध्ये बंदीस्त करून कत्तलखान्याकडे घेऊन जात असताना परळी वैजनाथ येथे ,हनुमान चौकाजवळ काही तरुणांनी अडविली व पोलिसांच्या स्वाधीन केली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला व जीपचालकाने गाडी अडविणाऱ्या तरुणांवर देखील मारहाणीचा गुन्हा नोंदविला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, दि. ११ मार्च रोजी सायंकाळी ७.२० वाजताच्या सुमारास परळी येथील हनुमान चौकाजवळ गोवंशीय जनावरांना कत्तलखान्याकडे घेऊन जात असलेला टेम्पो (एम एच १३ सी यू ०८८५) हा काही तरुणांनी मिळून अडविला. या टेम्पोत ८ गोऱ्हे दाटीवाटीने कोंबलेले होते. यावरून टेम्पोचालक इरशाद दस्तगीर शेख रा. पापनास, ता. माढा, जि. सोलापूर, आणि अतुल दुबे यांच्यात वाद सुरु झाला. याची माहिती पोलिसांना मिळाल्या नंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. चालक इरशाद याच्याकडे अधिक चौकशी केली असता टेम्पो अकबर युसुफ कुरेशी याच्या मालकीचा असून त्याने सदरील जनावरे बार्शीच्या बाजारातून गाडीत भरून दिली आणि परळी गौसभाई याच्याकडे देण्यास सांगितल्याची माहिती त्याने दिली. यावेळी इरशादजवळ वाहन चालक परवाना व आधार कार्ड, गाडीचे कागदपत्रे तसेच जनावरांचे पशुवैदयकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र यापैकी एकही कागदपत्र आढळून आले नाही. त्यामुळे पोलिसांनी पंचनामा करून जनावरे आणि टेम्पो असा एकत्रित ४ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आणि चालक इरर्षद, टेम्पो मालक अकबर युसुफ कुरेशी आणि गौसभाई असा तिघांवर कलम १५८, २३, ३ (१), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम ११(१)(डी) पशुसंरक्षण अधिनियम कलम ५ अन्वये परळी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.

Photo – File