मागासवर्गीय संघटनांचे परभणी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण – मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक व शिक्षिकांचा सहभाग

0
769
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी: नितीन ढाकणे-

राष्ट्रीय रोस्टर,हक्क,अधिकार,न्याय संघटना,भारत.
संस्थापक अध्यक्ष मा .संदीप फणसे
यांच्या मार्गदर्शनाखाली मागासवर्गीय संघटनेचे परभणी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण आज झाले शिक्षण विभाग जी.प. परभणी प्राथमिक शिक्षकांची बिंदू नामावली १५/०७/२०१७
रोजी मा.व.क विभागीय कार्यालय औरंगाबाद यांनी मंजूर केलेली होती सदर बिंदूनामावलीवर काही सामाजिक संघटनांनी दबाव तंत्र निर्माण करून शासन स्तरावर चौकशीची मागणी केली सदर बिंदुनामावली तयार करत असताना शिक्षण विभागाने प्रत्येक कर्मचाऱ्याची निवड कोणत्या प्रवर्गावर झाली आहे यांचे दस्ताऐवज ठेवणे गरजेचे आहे तरी तत्कालीन मुख्याधिकारी परभणी यांनी २००२ पूर्वीचे दस्ताऐवज सापडत नाहीत असे लिहून दिले त्यावेळी स्त्री चळवळीने मान्य करून आक्षेप माघार घेतला सदर चौकशी रोस्टर फेर तपासणी करत असताना शिक्षण विभागाने सर्व कार्यरत कर्मचाऱ्यांची निवड सूची घेऊनच फेरतपासणी करण्यात यावी या मागणीसाठी आज दिनांक १५/०३/२०१८ पासून राष्ट्रीय रोस्टर हक्क,न्याय संघटना भारत. परभणी जिल्हा परिषदे समोर बेमुदत उपोषण करण्यात आले

*प्रमुख मागण्या*

१) दि १५/०७/२०१७ रोजी जिल्हा परिषद परभणी शिक्षण विभाग( प्राथमिक) शिक्षक मंजूर बिंदुनामावलीनुसार रिक्त पदाचा अहवाल ग्रामविकास मंत्रालयाकडे तात्काळ पाठवावा.

२) ३१ मे २०१८ अखेर संभाव्य व पदोन्नतीने रिक्त होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांचा पदाचा अहवाल तात्काळ पाठवणे

३) दि १५/०/२०१७ मंजूर बिंदुनामावलीनुसार मागासवर्गीय प्रवर्गाची एकही जागा कमी करू नये.

४) आंतर जिल्हा बदली टप्पा २ परभणी जिल्हा परिषद यापासून वंचित राहू नये.

५) १९८३ पासून कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या निवड सुच्या उपलब्ध करूनच रोस्टर तपासणी(१०० बिंदूनामावली) करण्यात यावी .

६) वरील कार्यवाहीची लेखी स्वरूपात प्रत देण्यात यावी.