*परळीतील पोलिसांच्या विशेष पथकाची दबंग कारवाई – २० पोते गुटखा पकडला*

0
1089
Google search engine
Google search engine

बीड : प्रतिनिधी
नितीन ढाकणे व दीपक गित्ते /-

परळीत येत असलेला टेम्पो परळी पोलिसांच्या विशेष पथकाने अडवला त्यामध्ये संशयावरून त्यांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा आढळून आला
मंगळवारी पहाटे कारवाई करत पोलिसाच्या विशेष पथकाने २० पोते गुटखा पकडला. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नाईक नरहारी नागरगोजे, सचिन सानप सखाराम पवार, बाबासाहेब आचार्य, यांनी केली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, लातूर – पुणे मार्गावर रोजची वाहतूक करणारा एक आयशर टेम्पो (एमएच- २५- यु-१०४९) आज पहाटे टोकवाडी मार्गे शहराकडे येत होता. या वाहनात अवैधरीत्या गुटखा वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसाच्या विशेष पथकाला मिळाली होती. यावरून या वाहनाची झडती घेतली असता त्यात ४० पोते गुटखा आढळून आला. याबाबत अन्न व भेसळ अधिकारी आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सांगितले.

काल दि १५/०३/२०१८ अन्न व सुरक्षा अधिकारी बीड एच.आर. मोरेवार बीड यांनी तपास करून मालाची किंमत काढली त्यात १४ लाख ७५ हजार रुपयांचा माल व ताब्यात घेतलेल्या गाडीची किंमत ५ लाख रुपये अशी ऐकून किंमत १९ लाख ७५ हजार रुपये अशी आहे. आरोपी चालक
सुदर्शन हनुमान मुंडे रा.दादाहरी वडगाव
आरोपीवर कलम ४२ CRPC
दाखल झाली आहे.या सर्व प्रकारामुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे.