*बीडच्या संघर्षशील नेतृत्वास न्याय – मा.प्रा.टी.पी.मुंडे सर यांचा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीत समावेश*

0
729

बीड: नितीन ढाकणे –

अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या कार्यकारणीवर सदस्य म्हणुन महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे यांची आज निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे ८४ वे महाअधिवेशन शनिवारपासून नवी दिल्ली येथे सुरू झाले आहे. महाअधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अ.भा.कॉंग्रेस कमिटीची कार्यकारणीची निवड करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारणीवर काम करण्याचा बहुमान मराठवाड्यातुन प्रा.टी.पी.मुंडे यांना मिळाला आहे. प्रा.टी.पी.मुंडे यांनी कॉंग्रेसचे बीड जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस, परभणी व लातूर जिल्ह्याचे तसेच औरंगाबाद ग्रामीणचे प्रभारी म्हणुन यशस्वीरित्या काम केले आहे. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष खा.राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांनी त्यांना प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या अ.भा.कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीवर काम करण्याची संधी दिली आहे.याच माध्यमातून एका संघर्षास न्याय मिळाल्याची भावना कार्यकर्त्यां मधून व्यक्त होत आहे.