शेतकऱ्यांना पाईप लाईनद्वारे पाणी वितरण करण्यासाठी शेतकरी संघटनेचा एल्गार

0
730
Google search engine
Google search engine

आकोट(संतोष विणके )-

आकोट तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी पोपटखेड धरण आहे य
पोपटखेड़ ल. पा. योजना टप्पा 2 चे काम आगामी वर्षात पूर्ण होने अपेक्षित आहे .माञ या प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना कालव्याद्वारे न देता बंदीस्त पाईप लाईनने देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने एल्गार पुकारला आहे.सततचा दुष्काळ बघता पाण्याचा वापर काटकसारिने होने आवश्यक आहे. त्यासाठी शेती व पिण्याच्या पाण्याचे वितरण पाइप लाइन द्वारे केल्यास कलव्याद्वारे वितारणाच्या तुलनेत 60%ते 70 % पाण्याची बचत होवू शकते .वास्तविक शासन देखील अश्या धोरानात्मक निर्णयाच्या बाजुने आहे.तरी सुद्धा काही प्रशासकीय अधिकारीनि,काही लोक प्रतिनिधि ची दिशा भूल करुण मंजूर झालेली पाईप लाइन द्वारे वितरण व्यवस्थे ऐवजी खुल्या कलव्याचा आग्रह रेटून धरत आहेत .यामुळं पाण्याचा अपव्यय तर होईलच पन शासकीय निधीचा दुरुपयोग होऊ शकतो याविषयी आज शेतकरी संघटनेने पत्रकार परिषद घेत पाईप लाइन द्वारे पानी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी करत आपली कणखर भूमिका मांडली.अस न केल्यास शेतकरी संघटना आक्रमक पाऊल उचलेल असा ईशारा.यावेळी शेतकरी संघटनेचे नेते ललीत बहाळे,यांनी दिला.विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर माजी राज्यमंञी रामदास बोडखे यांनी ही या पञकार परीषदेत शासन- प्रशासनाच्या या गोंधळावर आपली भुमिका मांडत पाईप लाईनने पाण्याच्या वितरणाचे समर्थन केले. .या मधे काही निवडक प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांचा वैयक्तिक लाभ आहे. परंतु लाभ क्षेत्रातील लाखो शेतकरयांचे कायम चे नुकसान संभावित आहे .असे असतांना लाभ क्षेत्रामधे पानी वितरण करण्याच्या संबधाने कालव्या द्वारे पानी वितरण व्यवस्था बेशिस्त व भविष्याच्या दृष्टीने शेतकरयासाठी नुकसानीची आहे. कालवा प्रणाली मुळे पान्यासरखे अनमोल संपत्ति चा अपव्यय होते .हे आपन सर्वांनाच आज पर्यन्त च्या अनुभवाने माहिती आहे. त्यामुळे अशी बेशीस्त अशास्त्रीय पानी वितरण व्यवस्था शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या माथी मारने हा अन्याय आहे. जल वितारणाच्या संबधीत प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध असतांना हे तंत्रज्ञान तुलनेने कमी खर्चिक असतांना सुद्धा पानी व जामिनिच्या धूपी द्वारे जामिनिचा अपव्यय न टालने हा राष्ट्रीय साधन्नाचा अपव्यय आहे. भ्रष्टाचाराला वाव देणारे कालवे,पाण्याचा अपव्यव करणारे खुले कालवे ,योग्य रितीने पाण्याचे वितरण न करता येणारे खुले कालवे ,लाभ क्षेत्राच्या खुल्या जमिनीची धूप करणारे खुले कालवे ,जमिनीला पाणथळ करणारे खुले कालवे ,फायथोपथेरा सारखे रोग पसरविणारे खुले कालवे ,संत्रा फळबागा मध्ये डींक्या रोग पसरविणारे खुले कालवे,शेतकऱ्यांच्या हिताचे असणे शक्य नाही यामुळं शेतकऱ्यांना धरणाच्या लाभ होण्या ऐवजी प्रचंड नुकसानाला समोरे जावे लागणार आहे ,याचा अनुभव प ,महाराष्ट्र, मराठवाडा व आपणही काही भागात घेतला आहे ,अशा जल वितरण व्यवस्थेसाठी चाललेला खटाटोप प्रशासनाने आवरते न घेतल्यास यास शासन उग्र आंदोलनाला निमंत्रण देईल, शासनाच्या धोरणात्मक निर्णया विरुद्ध प्रशासन अशी काहीशी परिस्थिती या प्रकल्पा बाबत झाली आहे। विशेष म्हणजे प्रशासन सिंचनासाठीच्या या योजनेबाबत शेतकरी तथा शासनाला संभ्रमीत करत असल्याचा विरोधाभास शेतकरी संघटनेने आजच्या पञकार परीषदेत कागद पञांनिशी उघड केला.

शासकीय यंत्रणा ही पोपटखेड़ धरणातील पानी पाटाने देण्याच्या तयारित आहे जर का पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पाईप लाइन चा वापर न केल्यास जनप्रतिनिधि व शासकीय अधिकारी विरुद्ध शेतकरी संघटना झाडाझडती आंदोलन करणार असल्याचा एल्गार शेतकरी नेते ललित बहाळे यांनी पञकार परीषदेत बोलतांना दिला.पञकार परीषदेस राज्यमंत्री रामदास बोडखे ,शेतकरी संघटनेचे नेते ललीत बहाळे,नितिन लोखंडे, शेतकरी संघटना तेल्हारा तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर ,तेल्हारा तालुका युवा आघाडीचे नीलेश नेमाडे व इतर शेतक़री उपस्थित होते .