चांदूर रेल्वेत अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग आंदोलन संपन्न – अन्नदात्यासाठी सहवेदना केल्या व्यक्त >< शेतकरी आंदोलन समितीचे आयोजन

0
1151
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )

 यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हान येथील शंभर एकर पेक्षा अधिक शेतीचा लवाजमा असलेल्या, दोन वेळा गावाचे सरपंचपद भुषविलेले, सुशीक्षीत शेतकरी साहेबराव करपे यांनी १९ मार्च १९८६ ला कुटूंबासह आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येला सोमवारी ३२ वर्ष पूर्ण झाले. साहेबराव करपे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शहरातील तहसिल कार्यालयासमोर शेतकरी आंदोलक समितीतर्फे दिवसभर अन्नत्याग आंदोलन केले.

आजपर्यंत केलेले उपवास सामाजिक जाणिवेपेक्षा स्व:हितासाठीच होते. आसपासचे लोक आपल्याला चांगले म्हणतील या भावनेने आणि भरपूर उपवासाचे पदार्थ खाऊन केलेले होते. पण १९ मार्चला ”एक दिवस अन्नत्याग, अन्नदात्यासाठी” हा उपवास शेतकऱ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा होता. सोमवारच्या दिवशी ३२ वर्षांपूर्वी राज्यात पहिली शेतकरी आत्महत्या झाली होती. शेती करणं परवडत नाही म्हणून यवतमाळ जिल्ह्यातल्या महालगाव तालुक्यातल्या चिलगव्हाण या गावातील साहेबराव पाटील करपे यांनी आत्महत्या केली होती. महाराष्ट्रातल्या या पहिल्या शेतकरी आत्महत्येनं संपूर्ण राज्य हादरून गेले होते. सध्याच्या घडीला ३२ वर्षांनंतर हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या करून त्याचं जीवन संपवलं आहे. त्याला अनेक कारणं आहेत. त्यातील मुख्य कारण म्हणजे शेतकरी विरोधी कायदे आणि सरकारची शेती आणि शेतकऱ्यांबाबत असलेली अनास्था. याचा मुद्द्यांना हात घालण्यासाठी सोमवारी शहरात अन्नत्याग आंदोलन केल्या गेलं. पहिल्यांदाच फक्त पाणी पिऊन केलेला हा उपवास खरंच आत्मिक समाधान देऊन गेला. याने कदाचित शेतकऱ्यांच्या आयुष्यात लगेचच बदल घडेल असे नाही, पण त्यांच्या प्रति सहवेदना व्यक्त करता आली याचे नक्कीच समाधान असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांविषयी संवेदना असलेल्या प्रत्येकाचे हे आंदोलन होते. कारण आंदोलनस्थळी कोणताही मोठा नेता नव्हता, कोणताही झेंडा नव्हता. अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग असे आंदोलनाचे स्वरुप होते. या आंदोलनासाठी आलेल्यांनी शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती याद्वारे मांडली गेली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना आखून त्या गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्या पाहिजे. कर्जमुक्तीची गरज, शेतकऱ्यांच्या समस्येसाठी सर्वांनीच एकत्रित येऊन लढा देण्याची गरज आहे. असा सूर या ठिकाणी एकत्र आलेल्या आंदोलनकर्त्यांकडून आला. तसेच शेतकरी आंदोलनात चांदूर रेल्वे तालुका नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. अशयाच एका शेतकरी आंदोलनात परीसरातील शेतकरी आंदोलकांवर १२ डिसेंबर १९९८ रोजी झालेल्या गोळीबारात प्रकाश नानाजी काळे (राजना-नेकनानपुर), प्रमोद जवळकार (शिरपुर), गणेश शिंदे (भातकुली) ह्यांच्या शहीदत्वाचे स्मरण सुध्दा यावेळी झाले.

   या आंदोलनात सचिन जाधव, आम आदमी पार्टीचे नितीन गवळी, राजाभाऊ भैसे, प्रा. प्रसेनजित तेलंग, विवेक गावंडे, विलास आसोले, महेमुद हुसैन, संजय डगवार, कॉ. विनोद जोशी, बंडुभाऊ यादव, सुधाकरराव थेटे, विनोद लहाने, गौतम जवंजाळ, अरूण बेलसरे, महादेवराव शेंद्रे, भिमराव खलाटे, चंदु बगाडे, अजय वाघ, बिपीन देशमुख, रामदास निस्ताने, शिवाजीराव चौधरी, सागर दुर्योधन, विजय रोडगे, कृष्णकांत पाटील, अशोक हांडे, नंदु खेरडे, सुशिल कछवे,  राजु गायकवाड, संदिप ढोणे, शंकर गावंडे, प्रशांत शिरभाते, अमीत अलोने यांसह अनेक शहरवासी सहभागी झाले होते.