चांदूर रेल्वेच्या उड्डाण पूलाचे खरे श्रेय माझेच ! मात्र श्रेय खासदारांनी लाटले >< पत्रकार परिषदेत आमदार जगताप यांचा आरोप

0
694
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वेः- (शहेजाद  खान) 

मी गेल्या साडेतेरा वर्षापासुन चांदूर रेल्वे – धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत असुन ह्या भागातील भागातील खऱ्या समस्या काय आहे हे माझ्याशिवाय कोण ओळखणार? यामुळे शहरातुन बाहेर जाण्याकरिता रेल्वे लाईन ओलांडुन जावे लागत आहे. कधी अर्धा-अर्धा तास रेल्वेचे गेट बंद राहते. याप्रकारामुळे घुईखेड, राजुरा, सातेफळ, राजना, वाई, सांगुलवाडा, बागापुर, सुपलवाडा, जावरा-निमगव्हान, मांजरखेड (दा.), धनोडी, कळमगाव, कळमजापुर, बग्गी, जवळा, सोनगाव, शिवनी, तळेगाव, पुलगाव आदी अनेक गावातील प्रवाशी, विद्यार्थी हजारोंच्या प्रमाणात या रेल्वे लाईनवरून जातात. मात्र सदर रेल्वे लाईनवरील गेट बंद असल्यामुळे कित्येक रूग्ण दगावल्याची माहिती आहे. यावरून सदर क्रॉसींगवर उड्डाणपुल होणे फार आवश्यक असल्यामुळे व ही उणीव मला समजल्यामुळे सन २०१२ पासुन मी यासाठी प्रयत्नरत आहे. व शेवटी मंजुरात मिळून या उड्डाणपुलासाठी राज्याकडुन ३१ कोटी रूपये मंजुर करण्यात आले. परंतु अमरावती-चांदूर रेलवे-पुलगाव रा. मा. क्र. २९७  वरील नागपुर-मुंबई एल. सी. क्र. ७० चांदूर रेल्वे यार्डातील रेल्वे क्रॉसींगवर उड्डान पुलासाठी खा.रामदास तडस यांनी मंजुरात मिळवुन आणल्याच्या  बातम्या वाचल्याने मनस्वी दुःख झाले आहे. या रेल्वे उड्डानपुलासाठी सतत पाठपुरावा  केला असतांना श्रेय मात्र खासदार तडस यांनी लाटल्याचा आरोप आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी स्थानिक विश्रामगृहात रविवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

        या पत्रकार परिषदेला आ.प्रा.वीरेंद्र जगताप, चांदूर रेल्वे कृ.उ.बा.स.चे सभापती प्रा.प्रभाकर वाघ, जि.म.स. बँकचे संचालक बंडु देशमुख, चांदूर रेल्वे नगराध्यक्ष शिट्टू उर्फ निलेश सुर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुने उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना आ.जगताप म्हणाले की, चांदूर रेल्वे उड्डानपुलासाठी फेब्रुवारी २०१२ पासुन मंत्रालय पातळीवर पत्रव्यवहार सुरू केला. तेव्हा खा.रामदास तडस हे वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदारही नव्हते. आ.जगताप तिसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर मार्च २०१५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उड्डानपुलाच्या मंजुरीबाबत विधानसभा आश्वासन ६९१ प्रमाणे उड्डान पुलाचे मंजुरीचे आश्वासन मिळविले. सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या दालनात बैठक झाली. त्यामध्ये उड्डानपुल मंजुर करून घेण्याचे आदेश प्राप्त करून घेण्यात आले. तशी टिप्पनी आहे. अर्थसंकल्पीय तरतूद झाल्यानंतर १७ फेब्रुवारी २०१६ ला ३१ कोटी खर्चाला प्रशासकिय मान्यता प्राप्त झाली याचा पुरावा आहे. एवढे प्रयत्न करूनही पुलाचे काम सुरू होत नसल्याने अधिक्षक अभियंता, सा.बां.मंडळ अमरावती व कार्यकारी अभियंता, विशेष प्रकल्प विभाग अमरावती यांना पत्र देऊन तात्काळ निविदा प्रक्रिया राबवा असे पत्र दिले.या संदर्भात २०१८ च्या अर्थसंकल्पात पुन्हा २.५७ कोटीची तरतूद झालेली असुन केंद्राची मदत झाली तर हा पुल दोन वर्षात पुर्ण होईल, अन्यथा ३ ते ४ वर्ष लागुन शहरवासीयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. सदर उड्डानपुलाचे काम यावर्षी सुरू करण्यात आले तरी पुलाच्या बांधकामासाठी केंद्राच्या मदतीची नितांत गरज आहे. या कामात खा.रामदास तडस यांनी केंद्राचा अधिकतम निधी ओढून आणावा व तसा पुरावा द्यावा असे आ. जगताप यांनी म्हटले. तसेच चांदूर रेल्वे शहरात रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र मी रेल्वे गाड्यांच्या विरोधात आहो अशीच प्रतिमा रंगविण्यात आली. रेल्वे थांब्याकरीता रेल रोको कृती समिती व खा. तडस यांनी यशस्वी प्रयत्न करून दोन रेल्वे गाड्यांचा थांबा मिळवुन दिल्याबद्दल आम्ही खा. रामदास तडस यांचे जाहिर आभार मानल्याचे आमदार जगताप यांनी सांगीतले. या पत्र परिषदेला अशोकभैय्या जयस्वाल, प्रदीप वाघ, गणेश आरेकर, बंडु मुंधडा, मुरलीधर सराड, नगरसेवक गोटु गायकवाड, सतपाल वरठे, प्रफुल्ल कोकाटे, प्रणव भेंडे, सुरेश मेश्राम, विलास मोटघरे, रूपेश पुडके, पंकज मेश्राम, अनिस सौदागर, पुरूषोत्तम बनसोड, नरेंद्र मेश्राम, निवास सुर्यवंशी, अविनाश वानरे, शहेजाद सौदागर, राजु जालान यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.