पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणार्थ्यांनी केला दुष्काळमुक्तीचा संकल्प -दुष्काळमुक्तीची गुढी उभारून घेतली प्रतिज्ञा

0
992
Google search engine
Google search engine

करजगाव येथे नवीन वर्षाची श्रमदान करून केली सुरुवात !

*_रुपेश वाळके / विशेष प्रतिनिधी /_*

केवळ संकल्प न करता पाणी फाउंडेशनचे लोकचळवळीच्या माध्यमातून श्रमदानाचे काम महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून नागरिक, युवक , शेतमजूर हे सर्व पाणी फाउंडेशन च्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये उतरले आहेत. या स्पर्धेचे असेच सुरू राहिल्यास महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल, असा विश्‍वास नरखेड तालुक्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी व्यक्त केला.

नवीन वर्षाची श्रमदानाने केली सुरुवात करून करजगाव येथील शिवारात नरखेड तालुक्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी चक्क श्रमदानाच्या माध्यमातून दगडी बांध घालून दुष्काळमुक्तीसाठी निश्चय केला . करजगाव शिवाराची पाहणी करताना प्रशिक्षणार्थ्यांनी श्रमदानही केले. या वेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना ते म्हणाले, “”हजारो लोक श्रमदान करीत आहेत. हे एक पथदर्शी काम आहे. पाण्याचा संचय हाच आपल्याला विकासाकडे नेणारा आहे. आपल्या मेहनतीने आपण आपला विकास करू शकतो. ग्राम समृद्ध करू शकतो. पाण्याशिवाय जीवन नाही. पाण्यासाठी काम करणे देश कार्य आहे. निसर्गाने आपल्याला दिले आहे त्याचे योग्य संवर्धन केल्यास कधीही समाज गरीब, उपाशी, तहानलेला राहणार नाही.”

करजगाव प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधतांना प्रशिक्षणार्थ्यांनी श्रमदानातून कामे उत्तम प्रकारे करता येऊ शकतात आमच्या गावांची भौगोलिक स्थिती पाहता पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा होऊन आमच्या गावांतील पाणीपातळीही वाढू शकेल.” या वेळी त्यांनी वृक्ष लागवड करण्यासाठी गावमध्येच नर्सरीस तयार करून गावामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करन्याचा संकल्प घेऊन गाव पाणीदार करण्यासाठी प्रतिज्ञा घेतली ._*
*_दुष्काळाचा सामना करणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील जिल्ह्यातिल नरखेड तालुक्यातील नागरिकांनी गुडी पाडव्याच्या दिवशी दुष्काळमुक्तीचा संकल्प घेऊन आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून आपले गाव पाणीदार करण्यासाठी संकल्प घेतला . यामध्ये नरखेड तालुक्यातील ९२ गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतलाय.

गावकऱ्यांचा विश्वास वाढावा यासाठी नरखेड तालुक्यातील प्रशिक्षण घेतलेल्या ओरशिक्षणार्थ्यांनी नरखेड तालुक्यातील गावगावात जाऊन दुष्काळमुक्तीसाठी विशेष प्रयत्न करून गावकऱ्यांबरोबर श्रमदान करत पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून दुष्काळाशी सामना कसा करावा याविषयी मार्गदर्शन केलं जात आहे .
‘ही स्पर्धा गावागावातली नसून ती दुष्काळाशी आहे आणि ती आपण सगळे मेहनत करून जिंकणार,’ असा विश्वास नरखेड तालुक्यातील नागरिकांनी व्यक्त केला.

पाणी फाउंडेशनच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या चळवळीत लोकांचा उत्स्फूर्त सहभाग वाढत आहे़ लोकांची पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणामुळे प्रशिक्षित होऊन ज्ञान मिळाले त्यामुळे आमची हिंमत वाढवली अशी भावना नरखेड तालुक्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी बोलताना व्यक्त केली . त्यावेळी पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक रुपेश वाळके , बबिता इंगोले , राजू बाजारे , शिवहरी टेके , दीक्षा शेवाळे , मारोती चौरे , दयाल भादे , संदीप बोहोरुपी , दीपक बारस्कर , टिनल ठाणेकर यांच्यासह सर्व प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते .