पात्र शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा: जिल्हाधिकारी एम. डी. सिंह

0
794
Google search engine
Google search engine

पात्र शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा

बीड: परळी वैजनाथ
नितीन एस ढाकणे

बीड : बीड -महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 या योजनेअंतर्गत यापूर्वीच्या विहीत कालावधीत अर्ज करण्यापसून वंचित राहीलेल्या शेतक-यांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध करुन योजनेचा लाभ देण्यास शासनाने दि.28.2.2018 रोजीच्या निर्णयाद्वारे मान्याता दिली आहे . ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी दि. 1 मार्च 2018 ते 31 मार्च 2018पर्यंत असा असून या कालावधीत आपले सरकार सेवा केंद्रामार्फत शेतक-यांचे अर्ज स्विकारण्यात येतील. किंवा शेतक-यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी https;//csmssy.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर स्वत: नोंदणी करुन युजर आय.डी व पासवर्डच्या आधारे ऑनलाईन अर्ज भरणे आवशक आहे. अर्जाचा नमुना दि. 1 मार्च 2018 पासून संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. जिल्हयातील महा ऑनलाईन, आपले सरकार सेवा केंद्र व कॉमन सर्व्हिस सेंटरवर अर्ज विनामूल्य ऑनलाईन भरुन दिले जात आहेत. योजनेस पात्र शेतक-यांनी दि.31 मार्च 2018 पूर्वी आपले ऑनलाईन अर्ज भरुन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अन्वये कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह. यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.