चांदुर बाजार तालुक्यातशेतकरी पुन्हा संकटात

0
998
Google search engine
Google search engine

👉🏻चांदुर बाजार तालुक्यात कापूस उत्पादक शेतकरी यांच्या कृत्रिम संकट

👉🏻व्यापारी वर्ग यांच्या कडून पळीच्या किंमतीने मागणी.तर शेतकरी कापूस विक्री करीता व्यापारी यांच्या दारात

चांदुर बाजार :-

सतत 2 वर्षा पासून शेतकरी हा आसमानी आणि कृत्रिम संकटात सापडत असल्याचे चित्र चांदुर बाजार तालुक्यातील शेतकरी वर्गात दिसून येत आहे.2018 मध्ये चांगल्या प्रकारे पावसाळा होणार असल्याचे भाकीत वर्तविले गेले होते.मात्र पावसने दांडी मारली.

तसेच निसर्ग यांच्या मुळे कापूस उत्पादक शेतकरी यांच्या कपाशीच्या पिकांवर गुलाबी बोड अळी चा प्रादुर्भाव झाला. कृषी विभाग तर्फे काहींना लाभ मिडाला तर अजून काही आपल्या लाभ मिळतील या प्रतीक्षा मध्ये आहे.गुलाबी बोड अली मुळे कपाशीचे नुकसान तर झाले.मात्र निघणार कापूस सुद्धा हलका दर्जा चा निघाला.त्याला सुद्धा कीड लागल्याचे त्या वेळी दिसून आले.मात्र तरी शेतकरी यांनी त्याची वेचणी केली.कारण हजरो रुपये खर्च त्यावर झाला होता.

कापूस घरी आला मात्र भाव चांगला मिडल या आशेने त्याने कापसाची साठवण केली मात्र त्याला सुरुवातीला कीड लागल्याने शेतकरी यांचा कापूस कावरू लागला.त्यामुळे शेतकरी हा कापूस विक्री करीत शेतकरी यांच्या कडे जात आहे तर सरासरी भाव 5100 असताना शेतकरी याना 4400 या भावाची मागणी ही व्यापारी कडून होत आहे.या भावात खर्च निघेल अशी आशा नसल्याने शेतकरी कापूस देणार तरी कशा? मात्र या वर्षी गुलाबी बोड अळी ने शेतकरी हैराण झाला हे मात्र खरे.

बॉक्स
*नेहमी चा माल घेणार व्यापारी हा शेतकरी यांच्या घराकडे भटकत सुद्धा नाही आहे.त्यामुळे शेतकरी यालाच कापूस घेता का अशे विचारण्याची वेळ आली आहे.*