२७ मार्चला श्री  सुभाष वारे चांदूर रेल्वे शहरात – सुशिक्षीत बेरोजगार युवकांना करणार मार्गदर्शन

0
1130
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )
बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचे वचन देऊन अनेक सरकारे मोठ्या दिमाखाने सत्तेत आले. पण प्रत्यक्षात किमान रोजगारही सरकारला निर्माण करता आला नाही. नोकरी तर मिळत नाहीच पण चुकुन काही जागा निघाल्यास अशा जागांच्या संख्येपेक्षा कित्येक पटीने जास्त अर्ज येत आहेत. दिवेसेंदिवस वाढत असलेली बेरोजगारांची संख्या पाहता त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथील संविधान अभ्यासक तथा सुराज्य सेनेचे संस्थापक श्री सुभाष वारे २७ मार्च रोजी चांदूर रेल्वे शहरात येत आहे.
सुराज्य सेना, माणूसकी बहुउद्देशीय संस्था, साहस जनहितकारी बहुउद्देशीय संस्था, प्रहार विद्यार्थी संघटना, ए.आय.एस.एफ., आझाद हिंद क्रिडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, २७ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता स्थानिक सिनेमा चौकातील अशोक टॉकीजमध्ये सुशिक्षित बेरोजगार परिषद आयोजित केलेली आहे. या परिषदमध्ये बेरोजगारांना नोकऱ्या द्या किंवा १० हजार रूपये बेरोजगारी भत्ता द्या, अंशकालीन, होमगार्ड व कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमीत करून सर्व रिक्त जागा तातडीने भरा, महाराष्ट्राचा समतोल औद्योगिक विकास करून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीत करा, स्पर्धा परिक्षा शुल्क यु.पी.एस.सी. च्या धर्तीवर तसेच केंद्रशासनाच्या निकषाप्रमाणे असावेत, सर्व नोकर भरतीमध्ये पारदर्शकता आणून दरवर्षी किमान ५० हजारांच्यावर पोलीस भरती करण्यात यावी, केंद्र शासनाच्या महाराष्ट्र राज्याकरिता नोकर भरतीवर महाराष्ट्रातील स्थानिकांना 50 टक्के जागा राखीव ठेवा, मुद्रा योजनेअंतर्गत मागेल त्याला व्यवसायासाठी कर्ज देऊन स्किल इंडिया योजना अधिक प्रभावी व उपयोगी बनवावी, अल्पभूधारक व कोरडवाहू शेतकरी पुत्रांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र असलेल्या युवकांना नोकर्‍या द्या, स्पोर्ट कोट्यातील नोकरीच्यावेळी खेळाडूंची चाचणी मंडळाकडून न घेता शासकीय प्रशासनाकडून घ्यावी आदी मागण्यांवर मार्गदर्शन करणार आहे. सुशिक्षित बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथील संविधान अभ्यासक तथा सुराज्य सेनेचे संस्थापक सुभाष वारे, मुंबई येथील सुराज्य सेनेचे संस्थापक सदस्य राजेंद्र भिसे, नांदेड येथील सुराज्य सेनेचे सदस्य फारूख अहेमद मंगळवारी चांदूर रेल्वे शहरात येत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन प्राचार्य डॉ. जयंत कारमोरे, प्रा. डॉ. राजेंद्र हावरे, प्रा. डॉ. एस. एस. ठाकरे यांचीही उपस्थिती राहणार आहे. सदर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक नितीन गवळी व गौरव सव्वालाखे आहे.
तरी या सुशिक्षित बेरोजगार परिषदेला चांदूर रेल्वे तालुक्यासह जिल्हातील जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शहेजाद खान, प्राविण्य देशमुख, चेतन भोले, सौरभ इंगळे, संदिप शेंडे, पिंटु हुसैन, सागर दुर्योधन, निलीमा जवंजाळ, मयुरी चौधरी, मनिष खुने आदींनी केले आहे.