प्रेम आणि मृत्यू एकसमान असतात अस कुणी म्हटलं तर वावगं ठरू नये.

0
761
Google search engine
Google search engine

मृत्यू आयुष्य संपवतो आणि प्रेम आयुष्यातून उठवत.
माणूस प्रेमात पडतो. त्यातला प्रत्येक क्षण आपल्या आयुष्याला भारावून टाकतो. आपण प्रेमाच्या व्यक्तीसाठी जगतो , हसतो , रडतो, आपल सर्वस्व त्याच्यासाठी होत.
तो हसला तर आपण सुखी त्याच्या डोळ्यातील अश्रू म्हणजे आपली स्वतःच्या सुखाला तिलांजली. प्रेमात काही वेगळेपण रहातच नाही. जगण त्याच्यासाठी , झुरण त्याच्यासाठी सगळ काही त्याच व्यक्तीच्या अस्तित्वाशी बांधलेलं.
मग एक क्षण असा येतो की त्याला आपल्या प्रेमाच ओझ ,अडसर वाटायला लागतो. हा अडसर कधी त्याच्या महत्त्वाकांक्षेच्या मार्गातला असतो तर कधी त्याला अन्य कुणा नात्यासाठी आपल्याला सोडायचं असत. मग सुरु होतात शब्दांचे घाव , पण आपला भावनिक गुंता मात्र आपल्याला बाहेर पडू देत नाही.
ज्या क्षणी कळत आता ते तुटू लागल आहे त्या क्षणापासून आपली केविलवाणी धडपड सुरु होते आपल्या प्रेमाला बांधून ठेवण्याची. खर तर तोच वेडेपणा आपण करतो. जे आपल आहे ते आपल्याला सोडून द्यायचा विचार कधी करेल का ?
जिथे प्रेम आहे तिथे तोडून टाकण्याची भाषा कधी बोलली जाईल का ? हे साधे प्रश्न आपण स्वतःला विचारत नाही कारण आपल्याला उत्तरांची भीती वाटते. आपल्या मनाला हे कळत असूनही आपण प्रयत्न करत रहातो आणि एका क्षणी अखेरचा घाव घालून ती व्यक्ती मोकळी होते.

प्रेम जपण्याच्या नादात आपण खूप काही गमावून बसलेलो असतो पण तरीही आपण शेवटी त्याच व्यक्तीकडून पराभूत होतो ज्याच्याशी आपल्या सुखाची नाळ जोडलेली असते.
प्रेम व्यवहारी नसत , प्रेम आपल्या व्यक्तीच्या भावनांची नेहमीच कदर करत , कुणीतरी आपल्यावर विश्वास ठेवला आहे आणि तो आपण जपला पाहिजे हे प्रेमात सहज घडून जात पण हेही तितकच खर आहे की प्रेम आयुष्यातून उठवत.
दुसरा जितका सहजपणे नात्यातून बाहेर पडतो तितक्या सहजपणे आपण नाही पडू शकत कारण आपल्याला ते हव असत. पण प्रेम कधीच एकांगी सफल होत नाही. हा मिळालेला घाव प्रेमावरचा विश्वास कायमचा उडवून टाकतो. पुन्हा कधी गुंताव अस वाटत नाही कारण त्याच यातनांनी इतक कमकुवत केलेलं असत की पुन्हा नव्याने काहीही सहन करायची तयारी नसते….

खरच प्रेम आणि मृत्यू एकसमान असतात……