सोनहिवरा गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

0
1580
Google search engine
Google search engine

 

परळी : दिपक गित्ते

परळी : तालुक्यातील सोनहिवरा गावातील भवानी आई शिवारात आज सकाळी शेतकऱ्यांना बिबट्यासदृश्य प्राणी आढळून आला. यामुळे या भागात दहशतीचे वातावरण आहे. याबाबत माहिती मिळताच वन परिक्षेञ अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी व परळी ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याचा शोध घेतला. मात्र त्यांना बिबट्या आढळून आला नाही. सोनहिवरा येथील नामदेव मुंडे हे शेतात काम करत असतांना त्यांना अचानक काही अंतरावर प्राणी दिसला,

दिसलेला प्राणी हा वाघच असावा असा अंदाज गावकऱ्यांचा आहे

सुरुवातीस हा प्राणी म्हणजे वाघच असल्याची अफवा पसरली होती. या प्राण्याच्या दर्शनाने घाबरलेली शेतकरी हातातील काम सोडुन गावाकडे निघून आले. यानंतर ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरून परळी ग्रामीण पोलिस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात धाव घेतली. दोन्ही पथकाने गावकऱ्यांकडून माहिती घेऊन घटनास्थळी या प्राण्याचा शोध घेतला, परंतु त्यांना कसल्याची खुणा अथवा सदर प्रणयाची विष्ठा आढळून आली नाही. माञ, बिबट्या आला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

बिबट्याच्या खुणा आढळून आल्या नसल्या तरी शेतकरी माञ बिबट्याच्या दहशतीमुळे हादरून गेले आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अधिकारी येथे बिबट्या येवून गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जावून बिबट्याचा शोध घेतला. परंतु तो आढळून आला नाही किंवा त्याच्या पायाचे ठसे आढळून आले नाही. माञ बिबट्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दौनापूर, मांडवा येथे ही चार महिन्यांपूर्वी बिबट्या दिसला असल्याची माहिती आहे. हाच बिबट्या सोनहिवऱ्यात आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांनी घाबरून न जाता पुन्हा हा प्राणी दिसल्यास तातडीने वनविभाकडे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.