वनाधिकारी श्री अमोल गावनेर सुवर्णपदकाने सन्मानित

0
634

गजानन खोपे / :-

अमरावती वन परिक्षेत्रात २ हजार वन्य प्राण्यांचे जीव वाचवून त्यांना पुन्हा जंगलात सोडण्याचे काम करणारे वन विभागाच्या बचाव पथकाचे प्रमुख अमोल गावनेर यांना नुकताच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सुवर्ण पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. वन्य प्राण्यांना अभयदान देणे,जखमी प्राण्यांवर उपचार करणे,आदी कार्यात अमोल गावनेर व त्यांच्या चमूचा नेहमीच पुढाकार राहला असून,त्यांनी हजारोंच्या संख्येत नाग,धामन व इतर साप वाचविले आहेत.या कार्याबद्दल वनविभागाने त्यांना सुवर्णपदक जाहिर केले होते.त्यानुसार मुंबईत दोन दिवसापुर्वीच एक कार्यक्रम पार पडला त्यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. सुवर्ण पदक व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.यावेळी वनविभागाचे सचिव विकास खारगे,प्रधान मुख्य वनसंरक्षक भगवान आदि उपस्थित होते.