कामगार आयुक्तांनी केली परळी कामगार कल्याण केंद्राच्या कार्याची प्रशंसा

0
681
Google search engine
Google search engine

कामगार आयुक्तांनी केली परळी कामगार कल्याण केंद्राच्या कार्याची प्रशंसा
मुंबई येथून मिळाले प्रशंसापत्र

बीड : नितीन ढाकणे

परळी (प्रतिनिधी) : कामगार कल्याण आयुक्त सतीश दाभाडे यांनी परळी कामगार कल्याण केंद्राच्या उत्कृष्ट  कार्याची दखल घेऊन  प्रशंसा केली.  नुकतेच तसे प्रशंसापत्र मुंबई येथून परळी  कामगार कल्याण केंद्राच्या कार्यालयाला प्राप्त झाले.
परळी कामगार कल्याण केंद्रातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजना, उपक्रम व कार्यक्रमाची प्रशंसा करण्यात आली. कामगार व कामगार कुटुंबीयांपर्यंत या कल्याणकारी योजना पोहचविल्याबद्दल परळीच्या कामगार केंद्राच्या कार्याची प्रशंसा करणारे पत्र देण्यात आले. परळी कामगार कल्याण केंद्रातर्फे कामगार पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना,  पाठ्यपुस्तक सहायता योजना, गंभीर आजार सहायता योजना, संगणक शिक्षणासाठी अनुदान योजना, इंग्रजी संभाषण वर्ग, करिअर मार्गदर्शन, ब्युटी पार्लर प्रशिक्षण, कामगार कविसंमेलन, ग्रंथप्रदर्शन, महिला मेळावा, नाट्यस्पर्धा, रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिरे, यासह निबंध चित्रकला स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले.


या यशाबद्दल कामगार केंद्राच्या कर्मचाऱ्यांचे सत्कार केंद्र संचालक आरेफ  शेख यांनी केले.  यावेळी शिवाजी हुलगुंडे, उमा  ताटे, भगवान मंडलीक, मसरत खान, गंगाधर कांबळे आदी उपस्थित होते.
फोटो क्यापशन…. कामगार कल्याण केंद्राच्या महिला कर्मचाऱ्यांचे सत्कार करताना केंद्र संचालक आरेफ शेख, उमा ताटे, भगवान मंडलीक, मसरत खान,  शिवाजी हुलगुंडे, गंगाधर कांबळे आदी.