श्रीराम नवमी निमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेतील आयोजक व युवकांविरोधातील गुन्हे मागे घ्या  श्री वैभव वानखडे यांची निवेदनाद्वारे मागणी.

0
971
Google search engine
Google search engine

अमरावती / तिवसा –

तिवसा येथे दिनांक २५ मार्च २०१८ श्रीराम नवमी निमित्त युवक मंडळी व आयोजकांनी शोभायात्रा काढली होती. सदर शोभायात्रा परवानगी घेऊन काढण्यात आली होती.
केवळ एक मार्ग बदलवला यामुळे शोभायात्रेच्या आयोजक १६ युवकां विरोधात गुन्हे दाखल केले. यातील १३५, १४३, १८८, १०९ आदी कलम दाखल केले पैकी १४३ जमाव बंदी आहे, परंतु त्यांनी परवानगी काढली होती, आणि १०९ नुसार कुठलीही चिथावणी सुद्धा दिली गेली नाही .

 

 

तरी सुशिक्षित बेरोजगार, व परीक्षा देणाऱ्या तिवसा शहरातील १६ युवकांवर गुन्हे दाखल केले. यामुळे यातील शिक्षण घेणाऱ्या युवकांवर दाखल गुन्हयामुळे त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
सामाजिक उपक्रमांत असे गुन्हे दाखल झाल्यास न्याय कुणाकडे मागावा हा प्रश्न उपस्थित होतो.
याच शोभायात्रा मध्ये पोलीस बंदोबस्त असतांना पोलीस अधिकारी यांनी मार्गदर्शन केले असते तर अशी वेळ आली नसती. या युवकांवरील गुन्हे मागे घेण्यात येऊन काही कलमा खारीज करण्यात याव्या  या मागणीचे निवेदन आज अप्पर जिल्हादंडाधिकारी श्री परदेशी व निवासी उपजिल्हाधिकारी श्री व्यवहारे यांच्या सह अप्पर पोलीस अधिक्षक श्री मकानदार  यांना दिले व चर्चा केली याचबरोबर सदर निवेदनाचा प्रती जिल्ह्याचे पालकमंत्री श्री प्रवीणजी पोटे पाटील, खासदार आनंदराव अडसूळ साहेब, आमदार ऍड.यशोमतीताई ठाकूर यांना सुद्धा कार्यवाहीसाठी देण्यात आली.