रायुकॉं च्या तालुकाध्यक्षपदी पवन धावडे

0
1170
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) 
    राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी पवन साहेबराव धावडे यांची निवड नुकतीच करण्यात आली.
    ही निवड माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, माजी जि. प. अध्यक्षा सौ.  सुरेखाताई ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनिल वऱ्हाडे यांच्या आशिर्वादाने करण्यात आली आहे. रायुकॉं जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख यांच्या हस्ते निवडीचे प्रमाणपत्र पवन धावडे यांना देण्यात आले. यावेळी रायुकॉं जिल्हा सचिव मनोज गावंडे, प्रणय मांजरे, योगेश धावडे, मंगेश अतकरी, प्रशांत ठवकर, हरिष पडोळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.