उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी घेतली चीनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट

0
1086
Google search engine
Google search engine

बीजिंग – उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. या भेटीत अण्वस्त्र प्रसारबंदी आणि कोरियन द्वीपकल्पात शांतता रहावी, याविषयी दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. अण्वस्त्र प्रसारबंदीच्या संदर्भात चीनने उत्तर कोरियाशी संबंध सुधारण्याचे आश्‍वासन दिले आहे. किम जोंग उन हे २५ मार्चपासून ३ दिवसांसाठी चीनच्या दौर्‍यावर आले आहेत, असे येथील एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

चीन हा उत्तर कोरियाचा मित्र देश आहे; मात्र किम जोंग यांच्या अण्वस्त्र मोहिमेमुळे उत्तर कोरियावर निर्बंध घालण्यासाठी चीनवरील दबाव वाढत होता. शेवटी चीनने उत्तर कोरियावरील निर्बंधांची कार्यवाही केली आणि त्यात तेल अन् कोळसा यांवरील निर्बंधांचा समावेश केला. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले होते.