चांदूर औद्यागिक प्रशिक्षण संस्थेचे रासेयो शिबिर राजना येथे उत्साहात – ग्रामसफाई व  गावकऱ्यांचा घरगुती उपकरणांची केली दुरूस्तीची कामे

0
611
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे / शहेजाद खान –

येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सात दिवशीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिर राजना येथे
उत्साहात संपन्न झाले.

या शिबिराचे उद्घाटक म्हणून राजना सरपंच चंद्रमनी गजभिये व कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी औ.प्र.संस्थेचे प्राचार्य एस.एस.पाटबागे, प्रमुख अतिथी म्हणून गटविकास
अधिकारी सोनाली माडकर, उपसरपंच संध्याताई गावंडे,विस्तार अधिकारी उमप, ग्रामसचिव
मनिष इंगोले उपस्थित होते. सरपंच चंद्रमनी गजभिये यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात
आले. सात दिवस चाललेल्या या शिबिरात अरूण राऊत, कमलकिशोर पनपालीया, भीमराव
रामटेके यांचे ‘ व्यक्तीमत्व विकास ’ वर व्याख्यान झाले.राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी
मारोती मर्दाने यांनी ‘ अंधश्रध्दा निर्मुलन, बुवावाजी, वैज्ञानिक दृष्टीकोन, व्यसनमुक्ती’ या विषयी
प्रबोधन केले. दररोज सकाळी श्रमदानातून ग्रामसफाई तसेच राजना येथील नाल्यावर बंधारा
बांधण्यात आला.याशिवाय राजना येथील सार्वजनिक व घरगुती वेल्डींगची कामे श्री वसुले
व बेहरे सर यांनी करून दिली. इलेक्ट्रीकल उपकरणाची दुरूस्तीची कामे कुमार शिसोदे यांनी
करून दिली. ग्रा.पं.व गावकNयांच्या पेंटींगची कामे प्रमोद तायडे सर यांनी करून दिली. नळ
दुरूस्ती व फिटींगची कामे चांदूरकर सर यांनी करून दिली.

शिबिराचा समारोप औ.प्र.संस्थेचे प्राचार्य एस.एस.पाटबागे यांच्या अध्यक्षतेखाली व सरपंच
चंद्रमनी गजभिये व उपसरपंच संध्याताई गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या
शिबिराच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी मारोती मर्दाने व औ.प्र.सं.चे सर्व
निदेशक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.