राज्यातील १३ हजार अंगणवाडीताईंच्या हाताला पून्हा मिळाला रोजगार

0
677

 

राज्यातील १३ हजार अंगणवाडीताईंच्या हाताला पून्हा मिळाला रोजगार

बीड : नितीन एस ढाकणे

अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ कायदा लावून आंदोलनापासून परावृत्त करण्यात आले होते. तर त्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करुन राज्यातील १३ हजार अंगणवाडीताईंच्या हाताचा रोजगार हे सरकार हिरावून घेत होते. हे दोन्ही प्रश्‍न विरोधीपक्षनेते म्हणून ना. धनंजय मुंडे यांनी विधानसभेत मांडून सरकारला धारेवर धरले. त्या खात्याच्या खुद मंत्र्यांचा विरोध असतांनाही ना. धनंजय मुंडे यांनी अंगणवाडीताईंना न्याय मिळून दिला. यामुळे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख, कमल बांगर, दत्ता देशमुख, सचिन आंधळे यांच्यासह आंगणवाडीताईंनी ना. धनंजय मुंडे यांचे निवास्थान गाठून त्यांचा र्‍हदयी सत्कार करुन आभार मानले. यावेळी ना. मुंडे म्हणाले की महासंघाच्या मागण्या रास्तच असून येणार्‍या काळातही त्यांच्या पाठीशा ठाप पण मी असेल.

वयाच्या ६० व्या वर्षीच सेवानिवृत्ती केल्यामुळे १३ हजार अंगणवाडीसेविका व मदतनिसांची उपासमार होणार होती. त्यामुळे महासंघाच्या नेतृत्वाखाली सर्व अंगणवाडी सेविका एकवटल्या होत्या. त्यांनी राज्यभर आक्रोश मोर्चा काढला होता. दि. १९ मार्च रोजी विधान सभेत सेवासमाप्तीचे वय ६५ कायम ठेवण्याची घोषणा केली. मात्र त्यांनतर अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ कायदा लावून त्यांना हक्कापासून परावृत्त करण्यात आले होते.

हा कायदा रद्द करण्यासाठी ना. धनंजय मुंडे, शिवसेनेसह सर्वच विरोधक आणि अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या होत्या. त्यांच्यापुढे राज्य सरकार अखेर झुकले आणि अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला ‘मेस्मा’ कायदा स्थगित करण्यात आला. अंगणवाडी कृती समिती प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख, प्रदेश उपाध्यक्षा कमलताई बांगर, प्रदेश संघटक दत्ता देशमुख, जिल्हासंघटक सचिन आंधळे, परळी तालुकाध्यक्ष निर्मला कराड, परळी शहराध्यक्षा रजनी मोहड, अनेकजमन यावेळी सहभागी होते.