कामगार संघटनेचे मंत्री गिरीषभाऊंना निवेदन

0
817

मंत्री गिरीष भाऊंना निवेदन

 

कामगार संघटनेचे मंत्री गिरीषभाऊंना निवेदन

प्रतिनिधी: कृष्णा फड

मा. गिरीष भाऊ आम्ही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कामगार आम्ही जवळ जवळ १२० दिवसानंपासून विद्यापीठाच्या गेटवर बसलो आहे आहे तुम्हाला आम्ही प्रत्यक्ष ५ वेळेस भेटून निवेदन दिले आहे.साहेब तुम्ही सांगितल्या प्रमाणे मुंबईत तुमच्या दालनात विद्यापीठ प्रशासन आणि आमचे संघटनेचे प्रतिनिधी श्री. रामेश्वर नाईक सर यांच्या उपस्थित बैठक झाली बैठक मध्ये विद्यापीठ प्रशासनाला नाईक यांनी प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.
गिरीष भाऊ तुम्ही मा. अण्णा हजारे यांची फक्त ७ दिवसात दखल घेतली व त्यांना न्याय दिला आम्ही येवढ्या १२० दिवसापासून येवढ्या उन्हात बसलो आहोत, कृपया आमची पण अण्णा हजारे यांच्या सारखी दखल तुम्ही घ्यावी अशी सर्व कर्मचाऱ्यांना आशा आहे.
आज येवढ्या दिवसानं पासून आम्ही बाहेर आहोत आमच्या घरच्या चुली पूर्ण पणे बंद झाल्या आहेत आम्हाला पूर्ण पणे उपास मारीची वेळ आली आहे काही कर्मचाऱ्यांनकडे आजारासाठी सुध्दा पैसे नाहीत साहेब आमच्या मागल्या रास्त आहेत साहेब आम्ही फक्त सरकारच्या GR नुसार वेतन मागत आहे ६००० ते ६५०० मध्ये ह्या माघाईच्या काळात घर चालवणे कठीण झाले आहे फक्त सरकारी नियमानुसार समान काम समान वेतन मिळावे ही आमची प्रमुख मागणी आहे
मा. गिरीष भाऊ तुम्ही लवकरच प्रस्तावा बाबतीत सकारात्मक निर्णय घेऊन न्याय मिळवून देतील हिच अपेक्षा आमची सर्व कर्मचाऱ्यांची आहे
धन्यवाद साहेब.