मालवणच्या समुद्रकिनारी तब्बल 30 फूट लांबीचा देवमासा मृतावस्थेत

0
903

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमधील मालवण समुद्रकिनारी आज सकाळी भला मोठा देवमासा मृतावस्थेत आढळून आला. तब्बल ३० फुटांचा हा देवमासा असल्याची माहिती समजते आहे.प्रचंड भलामोठा देवमासा किनाऱ्यावर आल्यानंतर स्थानिक मच्छिमारांनी या माशाची पाहणी केली. त्यावेळी हा मासा दोन ते तीन दिवसांपूर्वीच मृत झाल्याचं समजलं.सध्या या माशाला प्रचंड दुर्गंधी येत असल्याने स्थानिकांनी याची माहिती प्रशासनाला कळवली आहे. दरम्यान, या माशाची विल्हेवाट कशा पद्धतीने करता येईल यासाठी प्रशासनाकडून सध्या चर्चा सुरु आहे. या माशाची दुर्गंधी तब्बल एक ते दीड कि.मी.च्या परिसरात पसरली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.हा देवमासा तब्बल 30 फूट लांबीचा आहे. त्यामुळे आता या माशाची लवकरात लवकर विल्हेवाट लावण्याचं मोठं आव्हान स्थानिक प्रशासनासमोर आहे.दरम्यान, या प्रचंड मोठ्या देवमाशाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत नेमकी माहिती अद्याप समजू शकलेली नाही.