ना. पंकजाताईंचा ‘ गांव तिथे विकास दौरा ‘ २ एप्रिल पासून

0
977
New Delhi: **COMBO** File photo of Union HRD Minister Smriti Irani and Maharashtra Minister Pankaja Munde. The Congress and AAP have demanded the resignation of both the ministers following their involvement in different controversies, in New Delhi on Thursday. PTI Photo(PTI6_25_2015_000233B)
Google search engine
Google search engine

ना. पंकजाताई मुंडे यांचागांव तिथे विकास दौरा एप्रिल पासून

खोडवा सावरगांव येथून प्रारंभ ; जनतेशी साधणार थेट संवाद

बीड :
नितीन ढाकणे
दिपक गित्ते

परळी दि. ३१  राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांचा ‘ गांव तिथे विकास दौरा ‘ येत्या सोमवार पासून (ता. २) सुरू होणार आहे. या दौ-याला खोडवा सावरगांव येथून प्रारंभ होणार असून गावोगांवी जावून ना. पंकजाताई मुंडे जनतेशी थेट संवाद साधणार आहेत.

पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी गांव तिथे विकास दौरा जानेवारी महिन्यात सिरसाळा गटातील तपोवन येथून सुरू केला होता. या दौ-याला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. परंतू त्या दरम्यान  तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या निवडणूका व त्याची आचारसंहिता जाहीर झाल्याने हा दौरा पूर्णपणे करता आला नाही. मध्यंतरी अधिवेशनामुळेही दौरा होवू शकला नाही. आता पुन्हा हा दौरा सुरू होत असून येत्या सोमवारी सकाळी ८.३० वा. धर्मापूरी गटातील खोडवा सावरगांव येथून दौ-याची सुरुवात होणार आहे. यादिवशी सकाळी १० वा. दैठणा घाट, ११.३० वा. गुट्टेवाडी, दुपारी १ वा. हाळम, सायंकाळी ४ वा. हेळम, ५ वा. भोजनकवाडी, ६ वा. धर्मापूरी आणि रात्रौ ७ वा. नंदागौळ येथे ना. पंकजाताई मुंडे जाणार आहेत.

मंगळवार ३ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वा. मालेवाडी तांडा क्र. १ व २, सकाळी ९.३० वा. मालेवाडी, १०.३० वा. वनवासवाडी, ११ वा. सेवानगर तांडा, दुपारी १२ वा.  मैंदवाडी व रूपसिंग तांडा,१२.३० वा.लेंडवाडी तांडा, १.३० वा.  मैंदवाडी, ३.३० वा. दौंडवाडी, ४.३० वा. आनंदवाडी, सायंकाळी ५.३० वा. नागदरा, रात्रौ ७ वा.  लाडझरी, ८.३० वा. लेंडवाडी, ९ वा. चांदापूर

बुधवार ४ एप्रिल – सकाळी ८.३० वा. वैजवाडी / धारावती तांडा, ९.३० वा. कासारवाडी, १०.३० वा. नंदनज, ११.३० वा.सारडगांव, दुपारी १२.३० वा. मिरवट, सायंकाळी ४.३० वा. वसंतनगर/ मोहदरा तांडा, ५.३० वा. मलकापूर, ६.३० वा.  मरळवाडी, रात्रौ ८ वा. मांडवा या गांवातील ग्रामस्थांशी त्या संवाद साधून विविध विकास कामांचा शुभारंभ व पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. या दौ-यात सर्व लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व पदाधिका-यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे यांनी केले आहे.