*खाकी वर्दीतील संवेदनशीलतेला आकोट वासीयांचा प्रतिसाद*

0
688
Google search engine
Google search engine

आकोट(संतोष विणके)ः

एक लाख लोकसंख्येचे आकोट शहर हे पोलीस दप्तरी अती-संवेदनशील म्हणुन ओळखले जाते.गेल्या काही वर्षात शहरातील नागरीकांना अनेकदा कायदा व सुव्यवस्थेच्या परीस्थीतीला सामोरे जावे लागले होते.माञ हे चिञ आता झपाट्याने बदलत आहे.अन हे चिञ बदलण्यासाठी आकोट शहर पो.स्टे.चे ठाणेदार श्री गजानन शेळके हे अविरत विविध सामाजीक प्रयोग राबवत आहेत .विशेष म्हणजे ठाणेदार शेळके यांनी कुशल नियोजन करत धार्मिक स्थळांची निष्काषन मोहीम नागरीकांच्या सहकार्याने अभुतपुर्व पणे यशस्वी करुन दाखवली आहे.त्यांनी शहरातील तणावाला कारणीभुत ठरणाऱ्या वाहतुक व्यवस्थेकडे विशेष लक्ष केंद्रीत केले असुन;संवेदनशील स्थळी स्वखर्चाने व कर्मचाऱ्यांच्या श्रमदानातुन रस्ते दुरुस्ती तथा डागडुजी करत समस्याच मुळातुन संपवण्याचा प्रयत्न केला आहे.यासह संवेदनशीलतेचा परीचय देणाऱ्या या अधिकाऱ्यांने एका गरीब ॲटोचालकाची आर्थिक मदत करत त्याला आत्महत्येसारखा निराशे पासुन परावृत्त केले .त्याशिवाय कायम वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांना पालीकेच्या मदतीने तात्पुर्ती जागा देत फेरीवाल्यांचा प्रश्न ही सोडवला आहे.यासर्वांमुळं निष्काषन मोहीम असो वा वाहतुकीची प्रश्न ,सामाजीक समस्या असो वा रस्त्यांची समस्या ठाणेदार गजानन शेळके हे नागरीकांच्या विश्वासासह लोकसहभागात खरे उतरत असल्याने खाकी वर्दीतील या संवेदनशीलतेला आकोट शहरवासीयांचा सकारात्मक प्रतीसाद मिळत आहे.या पुढच्या काळात ठाणेदार गजानन शेळके खाकी वर्दीतील संवेदनशीलतेचे कुठले सामाजीक प्रयोग राबवतात हे पाहणे आता औत्सुकत्याचे ठरणार आहे.