मनुष्याने त्याची बुद्धी अध्यात्माला समर्पित केली, तर त्याचा उत्कर्ष होईल ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

0
1547
Google search engine
Google search engine

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा

‘न्यूज २४’ वाहिनीचे निवेदक श्री. कृष्ण प्रसाद खनाल यांचा सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्याशी वार्तालाप

 

सद्गुरु (डॉ.) पिंगळे पुढे म्हणाले, ‘‘मनुष्याने सनातन धर्माच्या आचार-विचारांचे पालन केले, तर अयोग्य अशा रज-तम विचारांपासून त्याचे रक्षण होऊन तो सत्त्वगुणी व्यवस्थेकडे अग्रेसर होतो’, असे शास्त्र सांगते. यासाठीच सनातन संस्थेने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी संकलित केलेले ३०० हून अधिक ग्रंथ विविध भाषांमध्ये प्रकाशित केले आहेत. यात हिंदु धर्माशी संबंधित अनेक प्रश्‍नांची उत्तरे असल्यामुळे समाज सनातनशी जोडला जात आहे.’’काठमांडू – मनुष्याने त्याच्या बुद्धीचा उपयोग विज्ञानासाठी केला, तर विज्ञानाचा उत्कर्ष होईल; परंतु मनुष्याने त्याची बुद्धी अध्यात्माला समर्पित केली, तर त्याचा उत्कर्ष होईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. सद्गुरु (डॉ.) पिंगळे नेपाळ दौर्‍यावर असतांना  ‘न्यूज २४’ या वाहिनीचे निवेदक श्री. कृष्ण प्रसाद खनाल यांनी त्यांच्याशी वार्तालाप केला.