चीनची अवकाश प्रयोगशाळा पॅसिफिक महासागरात कोसळली

0
931
Google search engine
Google search engine

चीनची अवकाश प्रयोगशाळा पॅसिफिक महासागरात कोसळली

चीनची पहिली अवकाश प्रयोगशाळा ‘तियाँगगाँग’ अखेर ‘ताहिती’ देशाजवळ कोसळली. यामुळे संपूर्ण भारतीयांनी सुटकेचा निश्वास सोडला कारण हि अवकाश प्रयोगशाळा भारताच्या भूमीवर कोसळण्याची शक्यता वर्तवली जात होती.

भारतीय वेळेनुसार पहाटे 6:43 वाजता ‘तियाँगगाँग’ने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला व पुढील 3-4 मिनीटांमध्ये आकाशात मोठ्या प्रमाणात उल्का सदृश्य आगीचा लोळ निर्माण करीत 06:46 वाजता दक्षिण पॅसिफीक समुद्राच्या मध्यभागी असलेल्या छोट्याशा ‘ताहिती’ देशाजवळ कोसळली.