गट शिक्षणाधिकारी कार्यालय परळी वैजनाथ येथिल संगणक कक्षात संगणकांची चोरी >< चोरी झाली का केली? हा संशय उपस्थित केला जात आहे.

0
793
Google search engine
Google search engine

 

 

प्रतिनिधी दिपक गित्ते व नितीन ढाकणे

परळी:-वै – गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील संगणक कक्षा मध्ये अनेक मौल्यवान साहित्य असताना केवळ संगणकांचीच चोरी होणं हे संशयास वाव करणारे आहे . यात महत्वाच्या फाईल , संगणक यांचीच चोरी होणं यामुळे संशय अधिक प्रबळ होतो.

सध्या सुरू असलेले बदल्यांचे प्रकरण व झालेली चोरी यामध्ये बरेच साम्य दिसून येत आहे. या सर्व बाबींचा केंद्र बिंदू शिक्षकांचे बदली प्रकरण असावे. एकूण सर्व साहित्याची अंदाजित रक्कम १,२५,०००/- रुपये सांगितली जाते आहे. गटशिक्षणाधिकारी के. जी. खरात हे ३१मार्च रोजी सेवा निवृत्त झाले व लागलीच दुसऱ्याच रात्री चोरी झाली खरच हा योगा योग म्हणावा लागेल.