आर.टी.ई. अंतर्गंत मोफत प्रवेशित विद्यार्थ्यांना शाळेकडून अनधिकृतपणे फिसची मागणी

0
694
  1. आर.टी.ई. अंतर्गंत मोफत प्रवेशित विद्यार्थ्यांना शाळेकडून अनधिकृतपणे फिस मागणी केल्याचा तीव्र विरोध; गटशिक्षणाधिकार्‍यांनी घेतली दखल

बीड: नितीन ढाकणे

परळी  ः परळीतील इंग्रजी माध्यमांच्या शाळेत आर.टी.ई. अंतर्गंत मोफत प्रवेशित विद्याथ्याना संबंधित शाळेकडून अनधिकृतपणे फिस वसुल केल्याच्या विरोधात पालकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात बेकायदेशीर फिस मागितल्याच्या निषेधार्थ लेखी तक्रार नोंदविली. या अनुषंगाने आज दि.02/04/2018 रोजी प्रभारी गटशिक्षणाधिकारी हिना अन्सारी मॅडम यांनी तात्काळ संबंधित परळीतील इंग्रजी माध्यमांच्या सर्व शाळांना आर.टी.ई.अ‍ॅक्ट अंतर्गंत प्रवेश मिळूनही अनाधिकृतपणे फिस स्विकारत असल्याबाबतचे पत्र काढून दोन दिवसाच्या आत समक्ष येऊन खुलासा करावा. तसेच आर.टी.ई. अंतर्गंत  प्रवेशित विद्यार्थ्यांची फिसमुळे अडवणूक करण्यात येऊ नये नसता आपल्या शाळेचे ना मा. शिक्षणाधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाहीस्तव प्रस्तावित करण्यात येईल याची गंभीर दखल घ्यावी असेही त्यांनी कळविले आहे.

गरीब विद्यार्थ्यांचे पालक व सामाजिक कार्यकर्ते यांनी शिक्षणाचे बाजारीकरण त्वरीत थांबवावे व शासनाने घालुन दिलेल्या आर.टी.ई. अ‍ॅक्टचे पालन करावे. ज्यामुळे गरजु, होतकरू विद्यार्थी शिक्षणाच्या मुलभूत हक्कापासून वंचित राहु नये याची शासनाने गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा आर.टी.ई. अ‍ॅक्टीव्हीस्ट अनिल चिंडालीया, नगरसेवक किशोर पारधे, इंजि. भगवान साकसमुद्रे, वैजनाथ कळसकर, ओमप्रकाश शिंदे, पवन वाघमारे, मारोती कांबळे आदिंना दिला आहे.