पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीची ना. पंकजाताई मुंडेंनी केली पाहणी

0
694
Google search engine
Google search engine

पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीची ना. पंकजाताई मुंडेंनी केली पाहणी

प्रतिनिधी दिपक गित्ते

परळी दि. ०३ – पावणे पांच कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाला राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज भेट देऊन पाहणी केली.

ग्रामीण भागातील जनेतची कामकाजाच्या दृष्टीने होणारी गैरसोय लक्षात घेवून ना. पंकजाताई मुंडे यांनी गतवर्षी परळी पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी चार कोटी ७६ लाख रुपये इतका निधी मंजूर केला होता. सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण करून आठ महिन्यापूर्वी कामाचा शुभारंभही झाला. आता इमारतीचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. या इमारतीमुळे ग्रामीण जनतेची गैरसोय दूर तर झालीच शिवाय शहराच्या वैभवात यामुळे भर पडली आहे. अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त व प्रशस्त असलेल्या या इमारतीच्या कामाला आज सकाळी भेट देवून कामाची पाहणी केली व समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, ज्येष्ठ नेते श्रीहरी मुंडे, पंचायत समितीचे माजी उप सभापती प्रा. बिभीषण फड, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सुधाकर पौळ, गटविकास अधिकारी संजय केंद्रे, बांधकाम विभागाचे उप अभियंता काकड आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.