भारिप बहूजन महासंघाचे चांदुर बाजार तहसीलदार यांना निवेदन

 

घंटानाद आंदोलन करून मांडल्या मागण्या

चांदुर बाजार:-

स्थानिक चांदुर बाजार तहसीलदार यांना आज दिनांक 3 मार्च 2018 ला भारिप बहुजन महासंघ तर्फे मागण्या पूर्ण करण्यासाठी घंटानाद आंदोलन छेलण्यात आले होते यावेळी तहसीलदार यांना निवेदन देखील देण्यात आले.

1 जानेवारी ला झालेल्या भीमा कोरेगाव प्रकरणारील मुख्य आरोपी संभाजी भिडे याना त्वरित अटक करावी,बहुजन बांधव यांच्या वरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावी,ओबीसी, वि.जे.एन.टी.एस.बी.सी विध्यार्थी यांनी 100%शिष्यवृत्ती देण्यात यावी.,एस.सी.एस.टी. शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी,तसेच शेतकरी यांचा सातबारा कोरा करा.अश्या विविध मागण्याचे निवेदन आज तहसीलदार यांना देन्यात आले होते.
यावेळी निवेदन देताना भारिप बहुजन महासंघाचे चांदुर बाजार अध्यक्ष बाबूजी खांडेकर,अमरावती जिल्हा सचिव गुड्डू गवई,मोनिकताई कोकणे,शीला वानखडे,सागर तसरे, विशाल दामले,गजानन इंगळे,कुणाल सूर्यजोशी,सुभाष मनवरे,रमेश तांतरपले, योगेश पाटील,प्रतीक वासनिक तसेच मोठ्या प्रमाणात बहुजन महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।