अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याअंतर्गत पातुर येथे गुन्हे दाखल

0
868
Google search engine
Google search engine

फुलचंद भगत-वाशिम :-

पातुर येथील निराधार महिलेवर अत्याचार प्रकरण अ.भा.अंनिस पातुर तालुका यांनी घडलेल्या घटनेचा निषेध करुन पाेलीसांचे मानले आभार. अकोला-जिल्ह्यातील पातुर येथे एका निराधार महिलेवर अत्याचार केल्याची घटना तसेच हे संपुर्ण प्रकरण अंधश्रध्देतुन घडल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी सबंधितावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असुन या कामाकरीता अ.भा.अंनिस कार्यकर्त्यांनी पाेलीस स्टेशन पातुर येथे जाऊन अंधश्रद्धेमुळे घडलेल्या घटनेचा ठानेदार मा.खंडेरावसाहेबांकडुन आढावा घेतला .त्यांनी पुढील माहीती दिली . .पाेटात दुखत असल्याने बाबा अफतरखान,राेशनखान,व जब्बारखान यांनी महिलेला करनी केल्यामुळे तुझे पाेट दुखते त्यामुळ सैलानीला ,लाेणारला व शेवटी पातुर येथे तिला गुंगीचेऔषध देऊन तिचे आर्थिक व शारीरीक शाेषण केले.नंतर पुन्हा अश्लिल फाेटाे टाकुन पैशाची मागणी केली .पुरावे असल्याने आराेपींनवर गुन्हा दाखल झाला व आराेपींची पाेलीस काेठडी 10एप्रीलपर्यंत मिळाली. अभा.अंनिस पातुर अध्यक्ष दुलेखान ,सचिव अँड.रुपाली राऊत,सल्लागार कुद्दुस शेख यांनी मा.ठानेदार पातुर यांचे प्रकरनाच्या मुळाशी जाऊन सदरचे प्रकरन अंधश्रद्धेमुळे घडलेव भा.दं.वि.साेबतच जादुटाेनाविराेधी कायद्याची कलमे लावुन गुन्हा दाखल केला त्यामुळे त्यांचे पुष्पगुच्छ व मा.श्याम मानव संपादित लढा मासिक देऊन अभिनंदन केले वआभार मानले व आराेपींना कठाेर शिक्षा हाेन्याकरीता तांत्रिक बाबी पुर्ण करुन याेग्य तपास करन्याची विनंती केली.यावेळी अ.भा.अंनिस कार्यकर्ते व NtpL News चे सचिन मुर्तंडकर,दैनिक भास्कर प्रतिनिधी कुद्दुस शेख ,पुण्यनगरीचे दुलेखाँ ऊपस्थित हाेते.